संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या विरोधात लढण्याची महायुतीची ताकदच नाही – अंबादास दानवे

संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या विरोधात लढण्याची महायुतीची ताकदच नाही – अंबादास दानवे

मला महायुतीची कोणतीही ऑफर नाही. मला ऑफर देण्याचा कोणताही प्रश्नच येत नाही. मी शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता आहे. संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या विरोधात लढण्याची महायुतीची ताकद नाही. त्यांना आमच्या विरोधात उमेदवारही सापडत नाही. मराठवाडय़ात महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, असा ठाम विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज व्यक्त केला.

पक्षांतराच्या बातम्यांच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी बोलताना ते म्हणाले, मी 30 वर्षांपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. गटप्रमुख ते विरोधी पक्षनेता असा माझा प्रवास आहे. कोणताही आधार नसलेल्या बातम्या  माझ्याबद्दल पसरविल्या जात आहेत. ज्या चॅनेलनी माझ्याविरोधात खोटी बातमी चालवली त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये माझे नाव आहे. त्यामुळे मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा प्रचार करायचा आहे. मी एका आठवडय़ात 90 गावांचा दौरा करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संभाजीनगरमध्ये ताकदीने काम करणार आहोत. चंद्रकांत खैरे हे आमचे उमेदवार  आहेत. त्यांच्या प्रचाराचे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संभाजीनगरमध्ये महायुतीला आमच्या विरोधात उमेदवार सापडत नाही. मराठवाडय़ात महायुतीला एकही जागा मिळणार नाही. 4 जूनला मतमोजणीनंतर महायुतीमध्ये मोठा भूकंप होईल, असे अंबादास दानवे म्हणाले.

राज्यावर दुष्काळाचे सावट

राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. धरणातील पाणीसाठे कमी झाले आहेत, असे असताना फक्त सरकार राजकारणात गुंतले आहेत असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांच्याशी आमचा कुठलाही संपर्क नाही. त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कोणतीही चर्चा नसल्याचे स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;