दुसऱ्या कसोटीत लंकेचा संघ सुस्थितीत

वृत्तसंस्था/ चेतोग्राम

शनिवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत यजमान बांगलादेश विरुद्ध खेळताना लंकेने पहिल्या डावात दिवस अखेर 4 बाद 314 धावा जमविल्या. लंकेच्या तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकाविली. दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत लंकेने पहिली कसोटी मोठ्या फरकाने जिंकून बांगलादेशवर आघाडी घेतली आहे.

या कसोटीत लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निशान मधुष्का आणि करुणारत्ने या सलामीच्या जोडीने डावाला दमदार सुरुवात करुन देताना 28.5 षटकात 96 धावांची भागिदारी केली. उपहारापर्यंत बांगलादेशने गोलंदाजीत वारंवार बदल करुनही त्यांना लंकेची ही सलामीची जोडी फोडता आली नाही. उपहारावेळी लंकेने 27 षटकात बिनबाद 28 धावा जमविल्या होत्या. मधुष्काने 80 चेंडूत 6 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. खेळाच्या पहिल्या सत्राअखेर मधुष्का 55 तर करुणारत्ने 33 धावांवर खेळत होते.

उपहारानंतर लंकेची ही सलामीची जोडी लवकर फूटली. संघाचे शतक फलकावर लागण्यापूर्वीच मधुष्का एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाला. त्याने 105 चेंडूत 6 चौकारांसह 57 धावा जमविल्या. मधुष्का बाद झाल्यानंतर करुणारत्ने आणि कुशल मेंडीस यांनी आपल्या संघाला सुस्थितीत नेले. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 114 धावांची शतकी भागिदारी केली. करुणारत्नेने आपले अर्धशतक 93 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने झळकाविले. मेंडीस आणि करुणारत्ने यांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी 143 चेंडूत झळकवली. चहापानापूर्वी लंकेची ही जोडी फोडण्यात लंकेला यश मिळाले. हसन मेहमूदच्या गोलंदाजीवर करुणारत्ने त्रिफळाचीत झाला. त्याने 129 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 86 धावा झळकाविल्या. चहापानावेळी लंकेची स्थिती 58 षटकात 2 बाद 214 अशी होती. या कालावधीत कुशल मेंडीसने आपले अर्धशतक 87 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह नोंदविले. चहापानावेळी मेंडीस 65 धावांवर खेळत होता.

लंकेने खेळाच्या शेवटच्या सत्रात 100 धावांची भर घालताना 2 गडी गमाविले. दिवस अखेर लंकेने 90 षटकात 4 बाद 314 धावा जमाविल्या. चंडीमल 34 तर कर्णधार डिस्लिव्हा 15 धावांवर खेळत आहे. या सत्रामध्ये कुशल मेंडीस शकिब अल हसनच्या गोलंदाजीवर मिराझकरवी झेलबाद झाला. त्याने 150 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 93 धावा जमविल्या. मेंडीसचे शतक 7 धावांनी हुकले. त्यानंतर हसन मेहमूदने मॅथ्यूजला झेलबाद केले. मॅथ्यूजने 71 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23 धावा केल्या. चंडीमल आणि कर्णधार डिस्लिव्हा यांनी शेवटच्या अर्धा तासात सावध फलंदाजी करत संघाची अधिक पडझड होऊ दिली नाही. चंडीमल 2 षटकार आणि 2 चौकारांसह 34 धावांवर तर डिस्लिव्हा 2 चौकारांसह 15 धावांवर खेळत आहेत. बांगलादेशतर्फे हसन मेहमूदने 2 तर शकिब अल हसनने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक – लंका प. डाव 90 षटकात 4 बाद 314 (मधुष्का 57, डी. करुणारत्ने 86, कुशल मेंडीस 93, मॅथ्यूज 23, चंडीमल खेळत आहे 34, डिस्लिव्हा खेळत आहे 15, अवांतर 6, हसन मेहमूद 2-64, शकिब अल हसन 1-60).

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;