शिंदेंच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मोदी-शहांची नावे, निवडणूक आचारसंहितेचा भंग; राष्ट्रवादीची तक्रार

शिंदेंच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मोदी-शहांची नावे, निवडणूक आचारसंहितेचा भंग; राष्ट्रवादीची तक्रार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे दिली आहेत. पण दुसऱया पक्षाच्या नेत्यांची नावे आपल्या पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत टाकून शिंदे गटाने आचारसंहितेचा भंग केला असून या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरदचंद्र पवार)नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या पक्षाचे नेतृत्व करतात त्या पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये दोन चुका केल्या आहेत. शिंदे यांनी आपल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे दिली आहेत. त्याचप्रमाणे भाजपने त्यांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव नमूद केले आहे नियमानुसार कोणाची नावे अशा स्टार प्रचारकाच्या यादीत टाकू शकता, याची स्पष्टता निवडणूक आयोगाने दिली आहे. मात्र या पक्षांनी अशा पद्धतीने नावे वापरली असतील तर निवडणूक आयोगाला त्यांच्यांवर बंदी घालण्याचा अधिकारही आहे. हा प्रकार म्हणजे निवडणूक आचारसंहितेचा सर्रास केलेला सर्वात मोठा भंग आहे. कारण तुम्ही दुस-या पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षाच्या यादीत टाकू शकत नाही याकडे आव्हाड यांनी लक्ष वेधले.

एकनाथ शिंदे आणि भाजपने त्यांच्या स्टार प्रचारक यादीचा भाग म्हणून इतर राजकीय पक्षांमधील विविध व्यक्तींची नावे प्रसिद्ध केली आहेत, जी लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 77 चे उल्लंघन करणारी आहे असे तक्रारीत नमूद केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;