ई-पीक पाहणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

ई-पीक पाहणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

अहिल्यानगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यात आलेली पूरसदृश परिस्थिती, अवकाळी पाऊस आणि दुबार पेरणी यामुळे खरीप हंगाम 2025च्या ई-पीक पाहणी नोंदणीत अडथळे आले. यामुळे राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांना ई-पाहणीसह पुन्हा मुदतवाढ दिली असून, 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता येणार आहे.

महसूल विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून, राज्यात खरीप हंगाम 2025 साठी शेतकरी स्तरावरून पीकनोंदणी करण्याची मुदत 30 सप्टेंबर रोजी संपली होती. त्यानंतर 1 ऑक्टोबरपासून सहायक स्तरावरून नोंदणी सुरू करण्यात आली होती. ती मुदत 29 ऑक्टोबर होती. मात्र, नैसर्गिक संकटामुळे मोठय़ा प्रमाणावर पीकनोंदणी होऊ शकली नाही. आकडेवारीनुसार, आतापर्यंत डिजिटल क्रॉप सर्व्हेअंतर्गत राज्यातील एकूण क्षेत्रापैकी केवळ 36.12 टक्के पिकांचीच नोंद पूर्ण झाली आहे.

पीकनोंदणी न झाल्यामुळे शेतकरी नैसर्गिक आपत्ती, पीकविमा आणि पीक कर्ज यांसारख्या महत्त्वाच्या लाभांपासून वंचित राहू नयेत, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीला मुदतवाढ आलेली असल्याने शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत खरीप हंगाम 2025 ची ई-पीक पाहणी करून घ्यावी, यासाठी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात अद्याप खरीप हंगामातील पिकांची ई-पीक पाहणी झालेली नाही. पीकविमा योजनेसाठी ई-पीक पाहणी सक्तीची असून, अतिवृष्टीच्या अनुदानाचा लाभासाठी ई-पीक पाहणी फायद्याची असून शेतकऱ्यांना पीक कर्जासाठीदेखील ई-पीक पाहणीचा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी व महसूल विभागाने केलेले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हे करून पहा – टाचांना भेगा पडल्या तर… हे करून पहा – टाचांना भेगा पडल्या तर…
 टाचांना भेगा पडू नये, यासाठी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. पायाची बोटे, टाच मुलायम असावी असे प्रत्येकाला वाटते. जर...
दिल्लीत अग्नितांडव! रिठाळा मेट्रो स्थानकाजवळील झोपडपट्टीला आग; 500 झोपड्या जळून खाक, एकाचा मृत्यू
माली येथून पाच हिंदुस्थानींचे अपहरण; अल-कायदा व इसिसवर संशय
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण – शीतल तेजवानी आहे कोण?
अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’, अंबादास दानवे यांचा टोला
प्रवासात अचानक सीएनजी संपल्यास…
दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’; प्रवाशांचे प्रचंड हाल! 300 उड्डाणे उशिराने… देशांतर्गत विमानांना 5 ते 6 तास उशीर