IND vs PAK – पावसाने पाकिस्तानचा गेम केला! 2 धावांनी टीम इंडियाचा विजय
हिंदुस्थान पाकिस्तान सामना म्हटलं की चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचते. सध्याच्या घडीला हिंदुस्थानच्या संघाने विविध स्पर्धांमध्ये पाकिस्तानचा धोबीपछाड केलं आहे. आता पुन्हा एकदा दिनेश कार्तिकेच्या नेतृत्वात Hong Kong Sixes 2025 मध्ये टीम इंडियाने पाकिस्ताना धुव्वा उडवला आहे. पावसामुळे डकवर्थ-लुईस (DLS) पद्धतीने सामन्याचा निकाल देण्यात आला आणि टीम इंडियाला 2 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
टीम इंडियाने नाणेफेक गमावली आणि पाकिस्तानने त्यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना सहा षटकांमध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यात 86 धावा केल्या. या सामन्यात रॉबिन उथप्पाने पाकिस्तानची अक्षरश: धुलाई केली त्याने 11 चेंडूंचा सामना केला 3 षटकार आणि 2 चौकरांच्या मदतीने 28 धावांची वादळी खेळी केली. पाकिस्तानला जिंकण्यासााठी 87 धावांचे आव्हान मिळाले होते. आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने 3 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावांपर्यंत मजल मारली आणि अचानक पावसाचे आगमन झाले. त्यामुळे सामना थांबला आणि पुन्हा खेळला गेला नाही. त्यामुळे DLS नियमानुसार टीम इंडियाला अवघ्या दोन धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
हाँगकाँग सिक्सेस ही वनडे, कसोटी आणि टी-20 फॉरमॅटमपेक्षा पूर्णपणे वेगळी क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेत प्रत्येक सामना हा फक्त 12 षटकांचा म्हणजेच एक डाव 6 षटकांचा असतो. तसेच प्रत्येक संघात फक्त 6 खेळाडूचच असतात. साखळी फेरीतील सर्व सामने 6 षटकांमध्ये सहा चेंडू टाकले जातात. मात्र, सेमी फायलन आणि फायनलाच सामना सहा षटकांचा असतो. परंतु एक षटक 8 चेंडूंचे असते. या स्पर्धेचे आणखी काही मजेदार नियम म्हणजे नो-बॉलवर फ्री-हिट मिळत नाही, एखाद्या फलंदाजाने अर्धशतक ठोकलं तर त्याला रिटायर्ड हर्ट घोषित केलं जातं. तसेच संघातील प्रत्येक खेळाडूला यष्टीरक्षक सोडून कंपल्सरी एक षटक टाकावे लागते. एक खेळाडू दोन षटके टाकू शकतो. जर सहा षटकांचा खेळ होईपर्यंत संघाच्या पाच विकेट पडल्या. तर मैदानावर असणारा फलंदाज धावपटू घेऊन फलंदाजी करू शकतो.
टीम इंडिया संघ
दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, स्टुअर्ट बिन्नी, अभिमन्यू मिथून, शाहबाज नादिम, प्रियंक पांचाल, भारत चिपली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List