Mumbai News – दिल्लीनंतर मुंबई विमानतळावर तांत्रिक बिघाड, विमान सेवा विस्कळीत
दिल्लीनंतर मुंबई विमानतळावर तांत्रिक बिघाड झाल्याने विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिल्ली विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेत शुक्रवारी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुमारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय 300 उड्डाणे विस्कळीत झाली. याचा परिणाम मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरही जाणवला. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
मुंबई विमानतळातर्फे याबाबत एक निवेदन जारी केले आहे. दिल्लीतील ऑटोमेटेड मेसेज स्विचिंग सिस्टम (AMSS) मध्ये तांत्रिक समस्येमुळे मुंबई विमानतळावरील उड्डाण ऑपरेशन्सवर परिणाम झाला आहे. ही प्रणाली एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला मदत करते. संबंधित अधिकारी ही समस्या सोडवण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी आणि अपडेट्स मिळाल्यानंतरच फ्लाइटची स्थिती आणि सुधारित वेळापत्रक तपासावा. तसेच प्रवाशांना अपडेटेड माहितीसाठी त्यांच्या संबंधित एअरलाइन्सशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत विमानतळ व्यवस्थापनाने संयम आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List