तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; 70 संशयितांचा निकालही थांबवला

तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; 70 संशयितांचा निकालही थांबवला

महाराष्ट्रात तलाठी भरती सुरुवातीपासून वादात सापडली असून, अद्यापही हे प्रकरण मिटलेले नाही. त्यामुळे पात्र- अपात्र लोकांच्या मनात संशय निर्माण होत आहे. तलाठी भरती परीक्षेच्या सुरुवातीच्या गुणवत्ता याद्यांमध्ये पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार भूमी अभिलेख विभागाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित गुणवत्ता यादीनुसार अपात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे यात राज्यात सर्काधिक 214 गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचाही समावेश आहे.

तलाठी भरती परीक्षेतील काही परीक्षा केंद्रांवर झालेला गोंधळ आणि धाराशिव, लातूर येथील केंद्रांवरील गैरप्रकारांच्या तक्रारीनंतरही भरती पारदर्शक पद्धतीनेच झाल्याचा दावा राज्य सरकारने केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाकडून सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यात सुरुवातीच्या गुणवत्ता यादीमध्ये पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार आता अपात्र ठरले आहेत. याशिवाय 70 संशयित उमेदवारांचे निकालही थांबवण्यात आले आहेत. तलाठी भरतीसाठी टीसीएस कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा एकूण 57 सत्रांमध्ये 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;