मुंबईतील रस्त्यांच्या कामाची वाट लागली, उपनगरात फक्त 20 टक्के काम; पावसाळा खड्डय़ात जाणार

मुंबईतील रस्त्यांच्या कामाची वाट लागली, उपनगरात फक्त 20 टक्के काम; पावसाळा खड्डय़ात जाणार

पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर आला असताना पालिकेला शहरातील रस्ते कामासाठी कंत्राटदारच मिळत नसल्याची स्थिती आहे, तर पूर्व-पश्चिम उपनगरातील रस्त्यांची फक्त 20 टक्केच कामे झाली आहेत. त्यामुळे शिल्लक दोन महिन्यांत रस्त्यांची कामे पूर्ण कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला असून मुंबईकरांचा पावसाळा या वर्षी खड्डय़ात जाण्याची स्थिती आहे.

मिंधे सरकारने पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करीत शहरातील सर्व रस्ते एकाच वेळी सिमेंट काँप्रीटचे करण्याचा घाट घातल्यामुळे कंत्राटदार प्रतिसाद देत नसल्याने गेल्या सवा वर्षात तिसऱ्यांदा निविदा मागवण्याची वेळ आली आहे. या दिरंगाईमुळे मुंबई शहरातील रस्ते खड्डय़ात गेले आहेत. यातच मिंधे सरकारच्या कॉण्ट्रक्टर मित्रांच्या फायद्यासाठी प्रशासकाच्या माध्यमातून रस्ते कामात होणारा घोटाळा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उघड केल्याने शहरातील रस्ते कामासाठी तब्बल 300 कोटी कमी दराने निविदा काढण्यात आल्या. दरम्यान, शिवसेनेने रस्ते कामाच्या निविदेत घोटाळा उघड केल्यानंतर दक्षिण मुंबईतील रस्ते कामांसाठी नेमलेल्या आणि काम रखडवणाऱ्या मे. रोडवे सोल्युशन इन्फ्रा. प्रा. लि. या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात आल्यानंतर 1362.34 कोटींची नवी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.

असे आहे प्रकरण

खड्डेमुक्त मुंबईतील रस्ते करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये केली. त्यानंतर घाईघाईने निविदा प्रक्रिया राबवत पालिकेने जानेवारी 2023 मध्ये 910 सिमेंट काँक्रीटच्या सहा हजार कोटींच्या रस्ते कामाची वर्क ऑर्डर दिली. मात्र शहरातील 72 किमी रस्ते कामाकडे कंत्राटदाराने पाठ फिरवली. कंत्राटदार आणि पालिकेत वाद झाला आणि प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेले. अखेर न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि पालिकेने कंत्राट रद्द करत कंत्राटदाराला 64 कोटींचा दंड ठोठावला. तसेच शहरातील सिमेंट काँप्रीटच्या रस्त्यांसाठी 1,362 कोटींच्या नव्याने निविदा मागवल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;