ऐतिहासिक रामलीला मैदानावर आज घुमणार इंडियाची गगनभेदी ललकारी

ऐतिहासिक रामलीला मैदानावर आज घुमणार इंडियाची गगनभेदी ललकारी

‘ईडी’, ‘सीबीआय’,  ‘आयटी’सारख्या केंद्री य यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजकीय आकसाने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ उद्या ‘इंडिया’ आघाडीची गगनभेदी ललकारी दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर घुमणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या महारॅलीसाठी उपस्थित राहणार आहेत. मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधातील महारॅलीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

देशभरात ‘इंडिया’ आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे हादरलेल्या केंद्र सरकारकडून विरोधी पक्षांना केंद्री य यंत्रणांचा गैरवापर करून ‘नाकेबंदी’ करण्याचे कारस्थान सुरू  आहे. आता दिल्ली सरकारच्या कथित मद्य घोटाळय़ाप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार ही कारवाई केल्याचे स्पष्ट होत असल्याने दिल्लीसह संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

केजरीवालांपूर्वी झारखंडमध्येही तिथले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून ईडीने अटक केली होती. केंद्र सरकारच्या या एकाधिकारशाहीचा निषेध करण्यासाठीच ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून देशभरातील विरोधी पक्षांनी प्रचंड एकजूट दाखवत दिल्लीच्या रामलीला मैदानावर महारॅली काढण्याची तयारी केली आहे.

संताप, निषेध आणि धिक्कार

रामलीला मैदानावरील मोदींच्या हुकूमशाहीविरोधातील महारॅली ऐतिहासिक होईल, असा विश्वास या महारॅलीचे संयोजक व दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. आम्ही दिल्लीकरांनी या सभेला यावे यासाठी घरोघरी संवाद साधून निमंत्रण दिलेले आहे. केजरीवालांना अटक केल्यापासून जनतेमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे केंद्राच्या हुकूमशाहीविरोधात प्रचंड संताप, निषेध आणि धिक्कार केला जाणार असल्याचे ते म्हणाले.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती

महारॅलीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान, हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती, माकपाचे सीताराम येचुरी, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ’ब्रायन, द्रमुकचे तिरुची शिवा आदी दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;