1823 कोटी भरा… काँग्रेसला आणखी दोन आयकर नोटीस
‘इंडिया’ आघाडीमधील महत्त्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसला आयकर विभागाने आज आणखी दोन नोटीस बजावल्या असून 1 हजार 823 कोटी भरण्याचे निर्देश दिले आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोटय़वधी भरण्याचे आदेश आल्याने सूडबुद्धीने कारवाई सुरू असल्याचे बोलले जात आहे.
केंद्रातील हुकूमशाही मोदी सरकारविरोधात ‘इंडिया’ आघाडीची प्रचंड एकजूट झाल्यामुळे बिथरलेल्या केंद्र सरकारने केंद्री य यंत्रणांचा बेछूट वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचे कारस्थान सुरू केले आहे. यामध्ये शुक्रवारीच 1823 कोटी भरण्यासाठी नोटीस बजावली होती. तर आता शुक्रवारी रात्री उशिरा आणखी दोन नोटीस मिळाल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले. 2017-18 आणि 2020-21 या मूल्यांकन वर्षासाठी नोटीस बजावण्यात आली होती. प्राप्तिकर विभागाने 2017 ते 2021 या चार वर्षांच्या काळातील काँग्रेसच्या बँक व्यवहाराची तपासणी सुरू केली आहे. त्याविरोधात पक्षाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. त्याआधी 2014-15 ते 2016-17 या कालावधीतील तपासणी करून पक्षाला वसुलीची नोटीस पाठवली होती. त्यानंतर पक्षाची बँक खाती गोठवण्यात आली. त्यावेळी सुमारे दीडशे कोटींची वसुलीही करण्यात आली होती. आता तब्बल 1 हजार 700 कोटींची नोटीस पाठवण्यात आल्याने काँग्रेससमोर अडचणी वाढल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List