सिनेमा – मेरी ख्रिसमस

सिनेमा – मेरी ख्रिसमस

>> प्रा. अनिल कवठेकर

घडीभर मनोरंजनासाठी आपण नाटक-सिनेमे पाहतो. ते सिनेमे-नाटक पाहताना फारसा विचार न करता जे समोर दाखवो जातेय याचा आनंद घ्यायचा एवढेच आपण करतो. पण काही सिनेमे मेंदूला अस्वस्थ करून टाकतात. कारण समोर दिसणाऱया दृश्यातून आपल्या कथेचा शोध घ्यायचा असतो. समोर काय घडतेय, ते का घडतेय, अरे हे असे कसे? अशा पडोल्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची ज्यांना सवय आहे अशा प्रेक्षकांसाठी नेटपिक्मसवर आलेला सिनेमा म्हणजे ‘मेरी ख्रिसमस!’

‘मेरी ख्रिसमस ’ या सिनेमाची कथा म्हणजे एका रात्रीत घडणारी गोष्ट आहे. दोन व्यक्तिरेखा आणि त्यांच्यासोबत आाsल्या काही इतर व्यक्तिरेखा. 1985-86 साच्या मुंबईतून फिरणारा कॅमेरा. एसटीडी बूथ, रेल्वे स्टेशनवर पूर्वी असणारी वजन काट्याचे यंत्र, त्यातून बाहेर येणारे संदेशवजा वजनाचे तिकिट… मुंबई जेव्हा बाँबे होती त्यावेळची ‘मेरी क्रिसमस’ची कथा आहे. या सिनेमाचे वेगळेपण पहिल्या फ्रेमपासून जाणवते. पहिल्या शाटमध्ये पीनवर दोन मिक्सरची भांडी दोन जण चालवताना दिसतात. एक मिक्सरवर पुरुषाचा हात आहे, तर दुसऱ्यावर स्त्रीचा. हात दिसतात माणसे दिसत नाहीत. मिरची-डाळ बारीक केल्यानंतर त्यात तो एक अंगठी ठेवतो. ती औषधी गोळ्यांचे चूर्ण करते. हे संदर्भ लक्षात ठेवायचे आहेत आणि पुढे जोडायचे आहेत. हे असे वेगळे दिग्दर्शन आहे. ख्रिसमसच्या रात्री अल्बर्ट (विजय सेतुपथी) एका सात-आठ वर्षांच्या मुलीला कडेवर घेउढन जात आहे. त्याच्यासोबत चाणारी मारियाने (कतरिना कैफ) हातात मोठा टेडीबेअर घेता आहे. दोघेही बोलत नाहीत. ते दोघे कोण आहेत? प्रथमदर्शनी आपल्याला ते पती-पत्नी वाटतात, पण त्याचा उलगडा नंतर होतो. रस्त्याच्या कडेला लाल रंगाच्या पोस्टाच्या पेटीवर एक मांजर बसलेली आहे. पामेरा मांजरावर रेंगाळतो. ते मांजर वाट पाहत आहे. जशी पोस्टाच्या पेटीती पत्रे आपल्या मुक्कामी जाण्याची वाट पाहतात तशी. प्रेक्षकसुद्धा पुढे काय घडणार याची वाट पाहत आहेत आणि वाट पाहायला लावणे हेच श्रीराम राघवन या दिग्दर्शकाच्या शैलीचे वैशिष्ट्य आहे.

रात्रीच्या वेळी अल्बर्ट एकटाच रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या वजनाच्या यंत्रावर नाणे टाकून वजन दाखवणारे तिकीट घेतो. तिकिटावर राजेश खन्नाचा फोटो आहे. अल्बर्टचे वजन 86 को आहे. त्याचा संदर्भ असा की, कथा राजेश खन्ना लोकप्रिय होता त्या काळाती 1986 सालामधी आहे. वजनाच्या तिकिटावर भविष्य असते ‘द नाईट इज डार्केस्ट बिफोर द डान.’ पहाट होण्यापूर्वीची रात्र अधिक काळोखी आहे, हे भविष्य सिनेमाचा गाभा आहे. अल्बर्ट घरी येतो तेव्हा आजूबाजा अंधार आहे. त्याच्या शेजारी राहणारे अंकल फ्यूज ठीक करून क्रिसमसची रोषणाई करतात. ते अल्बर्टा स्वत बनवलेली वाईनची बाटली देतात व त्यामागची फिलॉसॉफी सांगतात, ‘आपण सगळे एका सुखद क्षणाची वाट पाहात असतो. प्रत्येकाच्या वाट्याला येणारा तो क्षण पकडून ठेवता आाा पाहिजे.’

नंतर अल्बर्ट एका हॉटेलमध्ये जेवाया जातो. ऑर्डर देऊन तो वॉशरूममध्ये जातो, तर तिथे एक माणूस बाहेर बसोल्या मारियाकडे बोट दाखवून मला महत्त्वाचे काम आल्याने मी निघून गेलो असा ता निरोप दे सांगून तो लगबगीने निघून जातो. इथे मारियाची आणि अल्बर्टची ओळख होते. तिथून ते सिनेमा पाहायला जातात. तिथे पहिल्या दृश्याशी असो कनेक्शन समजते. ती ाहान मागी मारियाची असते. त्यानंतर तो मारियाच्या घरी जातो. तिथे जे पाहतो ते पाहून तिथे असलेल्या सगळ्या वस्तूंवरचे आपल्या हाताचे ठसे पुसून घाबरून तो बाहेर पडतो.

जरा वेळाने त्या पुन्हा मारिया चर्चमध्ये दिसते. चर्चमध्ये ती रानी या पुरुषाबरोबर असते. अल्बर्ट तिच्या मागावर असतो. मारियाला चक्कर येते तेव्हा रानी (संजय कपूर) आणि अल्बर्ट तिला कारमधून तिच्या घरी घेऊन येतात. आता अल्बर्ट गोंधळात पडतो की, मारियाचे काय चोय आणि त्याहीपेक्षा जास्त प्रेक्षक गोंधळात पडतात की, पडद्यावर काय चोय.

ती अल्बर्टला घरातून जाण्याची विनंती करते. हे सगळे इतके शांतपणे चालो असते की, आपल्याला मेंदा ताण द्यावा लागतो की हे काय घडतेय? मग एक विलक्षण घटना घडते आणि तिथून सिनेमाची रंजकता वाढते. पहिल्या शाटमधी दोन मिक्सरची भांडी, टेडीबेयर, पत्रपेटी, त्यावर बसलेली मांजर, स्टेशनवरचे वजनाचे मशीन, बायबलमध्ये ठेवलेल्या शंभराच्या नोटा, एसटीडी टेलिफोन बूथ, कागदाचे पक्षी, चहाच्या किटलीतून बाहेर पडणारा धूर… या सगळ्यांचा जाणीवपूर्वक उपयोग करून दिग्दर्शकाने कथा मांडी आहे. उदाहरणार्थ चहाच्या किटलीतून निघणाऱया धुराने आणि झाकणाच्या उडण्याने जेम्स वॅटला वाफेच्या शक्तीचा शोध लागला. दिग्दर्शक आपल्याला कथेतो दुवे शोधण्याची, ते जोडण्याची संधी देतो. अल्बर्ट अनेकदा कागदाचा राजहंस बनवतो. संपूर्ण सिनेमात त्याने 20-25 राजहंस बनवले असतील. राजहंस म्हणजे निरक्षीर विवेक जो विवेक अल्बर्टकडे नाही. त्याला आयुष्यात सत्य काय आहे हे ओळखताच आलो नाही. हे दिग्दर्शकाचे कसब आहे.

ख्रिसमसच्या रात्री जेव्हा मारिया, रानी आणि अल्बर्ट तिघेही कारमधून प्रवास करतात तेव्हा बाकग्राऊंडमध्ये वाजणाऱया गाण्याने त्या दृश्या वेगळा अर्थ प्राप्त होतो. ‘रोज शाम आती थी, मगर ऐसी न थी…’ किंवा तो तिच्या घरात नेमके काय झाले याचा शोध घ्यायला जातो तेव्हा पोलीस येतात आणि तेव्हा गाणे वाजते, ‘जब अंधेरा होता है, आधी रात के बाद…’ ही गाणी त्या दृश्यांची परिणामकारकता वाढवते. म्हणून हा सिनेमा वेगळा वाटतो. दिग्दर्शकाच्या मनात नायिकेच्या भूमिकेची मांडणी स्पष्ट असल्याने कतरिना कैफचा अभिनय खरा वाटूच नये असा आहे. नाहीतर त्या भूमिकेला न्याय देऊ शकणाऱया अनेक नायिका आहेत. इथे कतरिनाने अतिशय साधी दिसत या भूमिकेला अभिनय न करता योग्य न्याय दिलेला आहे. संवाद कमी आहेत, पण प्रत्येक जण कोणती ना कोणती कथा सांगतो. महिला पोलीस खुनाविषयी वेगवेगळे दृष्टिकोन रंगवून सांगते. मारिया आपली प्रेमकथा अल्बर्टला सांगते. अल्बर्ट आपली प्रेमकथा तिला सांगतो. मारियासोबत आाsली रानीची बायको आपल्या नवऱयाविषयी वेगळीच कथा पोलिसांना सांगते. अल्बर्टच्या शेजारी राहणारा अंकल अल्बर्टच्या आईची कथा अल्बर्टला सांगतो. दोघांचे संवाद जरा सायको वाटतात. कारण एकमेकांशी संवाद साधताना विचारलेल्या प्रश्नांची तिरकस उत्तरेच संवादामधून पाहायला मिळतात. सिनेमागृहात मारिया अल्बर्टा टेडीवर लक्ष ठेवायला सांगते. ती जागेवर आल्यानंतर त्याला थँक्स म्हणते, तर तो म्हणतो, ‘ये तो भागने की कोशिश कर रहा था मैने बिठाके रखा है’ हा विनोद आहे की त्याचा सनकीपणा? इथेच मनात शंकेची पाल चुकचुकते. तो तिला सांगतो की, तो दुबईत आर्किटेक्ट आहे आणि घराची जाहिरात ‘घर नाही खुशिया खरीदो’ अशी केली जायची. ती विचारते ‘खुशिया खरीद सकते है?’

जीवनाच्या अनुभवातून आलेला जगण्याता कडवटपणा शब्दाशब्दातून जाणवतो. अल्बर्टच्या पहिल्या प्रेयसीची अंगठी त्याच्याकडे पाहून ती विचारते, ‘ये रिंग लिए क्यू घूम रहे हो.’ तेव्हा तो ‘जिस दिन भूल जाऊंगा फेक दूंगा’ असे सांगतो. ‘वो मर चुकी है, सात साल हो चुके है…’ अशा संवादांतून त्यांच्या सायकोपणाची झाक जाणवते. झा मर्डर पोलीस स्टेशनमध्ये वेगळ्या रीतीने मॅनेज झालेला आहे. छोट्या आना अचानकपणे वाचा येते. पोलीस तिला विचारतो हे गिफ्ट तुला कोणी दिले. ती सांगते सांताने दिले. हे दोन शब्द सिनेमाचा शेवट बदलतात आणि सगळे संदर्भ उागडतात.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;