कलापरंपरा – गंजिफाचा नवा प्रवास!

कलापरंपरा – गंजिफाचा नवा प्रवास!

>> प्रतिभा वाघ

मृतवत झालेल्या कलेला पुनर्जीवित करण्यासाठी कलाकार जसा आवश्यक आहे तसाच आश्रयदाताही! सावंत भोसले घराण्यांनीगंजिफाकलेला पुनर्जीवन दिले. आज त्यांची तरुण पिढी हे काम जोमाने प्रगतीपथावर नेत आहे.

मृतवत झालेल्या कलेला पुनर्जीवित करण्यासाठी कलाकार जसा आवश्यक आहे तसाच आश्रयदाताही! कलावंताला राजाश्रय मिळाला की त्याची उदरनिर्वाहाची चिंता मिटते आणि तो शांतपणे कलानिर्मिती करतो.

1970 साली सावंतवाडीची ‘गंजिफा कला’ मृतावस्थेला आली होती. पण सावंतवाडीच्या राजवाडय़ात त्या वेळच्या महाराणीसाहेबा सत्त्वशीला भोसले या स्वतः चित्रकार असल्यामुळे त्यांनी याकरिता खूप मेहनत घेतली. गंजिफाचे काम करणारे गावातील 80 वर्षांचे चित्रकार पुंडलिक चितारी यांची पाच तरुण चित्रकारांना मार्गदर्शन देण्यासाठी नेमणूक केली. त्यामुळे राजवाडय़ाच्या ‘दरबार हॉल’मध्ये कार्यशाळा सुरू झाली. आजपर्यंत अनेक चित्रकार येथून शिकले आहेत. आज एक फॅशनडिझाइनर, एक आयटी झालेली, एम.ए. झालेली असे विविध क्षेत्रांतील आणि कला महाविद्यालयातील आणि महाविद्यालयातील तरुण-तरुणी प्रशिक्षणासाठी येतात.

सावंतवाडी राजवाडय़ामध्ये एक म्युझियम आहे. त्यात विविध चित्रकारांची चित्रे, कलात्मक वस्तूंचा संग्रह आहे. दहाव्या-बाराव्या शतकातील दगडी शिल्पे येथे पाहवयास मिळतात.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक कलांचे अस्तित्व हळूहळू लोप पावत गेले. तशी वेळ गंजिफावर येऊ नये, याकरिता राजघराण्यातील तरुण पिढीचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

युवराज लखम (लखम खेम सावंत भोसले) आणि युवराज्ञी श्रद्धा (श्रद्धा लखम सावंत भोसले) हे दोघेही अमेरिकेतून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेऊन आले आहेत. युवराज लखम बेकरीमधले खास शेफ तर युवराज्ञी श्रद्धाजी कोरियन आणि जपानी पद्धतीमधील कुशल शेफ आहेत.

सावंत भोसले घराण्यातील पाच महाराण्यांना त्यांनी एक सुंदर भेट अर्पण केली आहे. ती म्हणजे एक नावीण्यपूर्ण, कलात्मक असे निवासी सावंतवाडी पॅलेस बुटिक आर्ट हॉटेल पूर्णपणे ‘गंजिफा’ ही थीम घेऊन केले आहे. गंजिफामधील विष्णूच्या दशावतारातील पहिले सहा अवतार घेऊन प्रत्येक खोलीला क्रमांकाऐवजी अवतारांची नावे दिली आहेत. जसे मत्स्य, कुर्म, वराह अवतार इ. दार उघडताना बोल्टवर मत्स्यावतार रूममध्ये त्या अवताराचे चित्र दिसते. प्रवेश केल्यावर भिंतीवर मत्स्यावताराचा गंजिफा (मास्टर कार्ड) मोठय़ा आकारात वर्तुळाकारात काढलेले पेंटिंग दिसते. आतील फर्निचरवर असलेले नक्षीकाम शोभिवंत वस्तू गंजिफा चित्रशैलीशी संबंधित आहेत. इथे येणाऱ्या भारतीय परदेशी पाहुण्यांना कळत नकळत गंजिफाची माहिती व्हावी हा त्यामागील उद्देश आहे.

याच वाडय़ात एक गंजिफा कॉर्नर आहे. तिथे गंजिफाचा संच ठेवला आहे. मनाला आनंद देणारा हा कलाप्रकार पाहुण्यांना कलानिर्मितीचा आनंद देतो. याच कार्यशाळेत पाहुण्यांना गंजिफाचे गोल कार्ड दिले जाते. त्यांना त्यात रंग कोणते वापरायचे, ब्रश कसा पकडायचा ते मार्गदर्शन केले जाते. ते स्वतः एक कलाकृतीच निर्माण करतात.

गंजिफा खेळही खेळण्याचा अनुभव आणि आनंद इथे घेता येतो. थोडेसे प्रशिक्षण दिले, काही नियम समोर ठेवले की पाहुणे खूप आवडीने गंजिफा खेळतात.

गंजिफाबरोबर काही पारंपरिक खाद्य परंपराही इथे जपली जाते. राजवाडा थाळीमध्ये राजघराण्यातील मुदपाकखान्यात पूर्वी बनविले जाणाऱ्या आणि आता माहीत नसलेल्या पदार्थाचा आस्वाद घेता येतो. युवराज आणि युवराज्ञी दोघेही आपल्या ज्ञानाचा पाककौशल्याचा पुरेपूर उपयोग करतात. रात्रीच्या जेवणात जपानी, कोरियन पदार्थ आणि गोड पदार्थ असतात, तर एक रात्रीचे भोजन राजघराण्यातील मंडळीसोबतही असते. ‘जुने ते सोने’ आणि ‘नवे ते हवे’ या विचाराने प्रेरित होऊन राजवाडय़ातील कलापरंपरा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम तरुण पिढी करीत आहे. पूर्वी मागणी कमी असल्यामुळे कलावंतानाही मानधन देताना विचार करावा लागे. पण आता सोशल मीडियामुळे लाकडी बाहुल्या, छोटय़ा पेटय़ा, ट्रे गंजिफा आणि इतर अनेक कलात्मक वस्तूंची मागणी वाढत आहे.

सावंत भोसले घराण्यांनी ‘गंजिफा’ कलेला पुनर्जीवन दिले. आज त्यांची तरुण पिढी हे काम जोमाने प्रगतीपथावर नेत आहे. या घराण्याला धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!

[email protected] 

(लेखिका चित्रकर्ती, लोककला अभ्यासक कलाशिक्षण तज्ञ आहेत)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;