परीक्षण – आत्मिक आनंदाची अनुभूती

परीक्षण – आत्मिक आनंदाची अनुभूती

>> प्रेमा खांडवे

का प्रतिभासंपन्न कवयित्रीच्या लेखणीतून उतरलेला हा कथासंग्रह निश्चितपणे कवितेचे गर्भरेशमी वस्त्र लेवूनच कथेच्या विश्वात उतरला आहे. समर्पक प्रतिमा, काव्यात्म भाषा, कल्पकता अन् चित्रदर्शी भाषाशैली इत्यादींनी अलंकृत असा हा कथासंग्रह वाचल्यानंतर एका आत्यंतिक आत्मिक आनंदाची अनुभूती जाणवते. कथासंग्रहाला ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचे आशीर्वाद, सिद्धहस्त कथालेखक, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री. भारत सासणे यांची साक्षेपी प्रस्तावना व 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष  डॉ. रवींद्र शोभणे यांची पाठराखण लाभली आहे.

या कथासंग्रहातील सातही कथा समृद्ध, सशक्त व वैविध्यपूर्ण कथानक, जिवंत रसरशीत पात्रचित्रण अन् मनमोहक चित्रमयी भाषाशैली, अशा गुणालंकारांचे उदाहरणच आहेत. प्रत्येक कथेचे कथानक वेगळे, निवेदनाचा  घाट वेगळा, पात्रवैविध्यता मनोवेधक!  या कथासंग्रहातील बहुतांश कथा या स्त्राrकेंद्रित आहेत. फक्त  ‘गावाहून गावाकडे’ ही कथा अपवाद आहे, पण त्यातही संतानहीन स्त्राrच्या आयुष्यातली आंदोलने आहेतच. बाकी कथांमधून स्त्रियांच्या वाट्याला आलेले दुःख, जीवघेण्या वेदना व्यक्त झाल्या आहेत. ‘रिकन्स्ट्रक्शन’मधील विद्या, ‘औटघटकेची राणी’तील मीरा, ‘कवडशांचे फूल’मधील राजू किंवा ‘खिंडार’मधील अपर्णा या सर्व शापिता त्यांच्या वर्तमान व भूतकाळातील घटनांच्या कारणाने दुःख भोगीत आहेत. त्यांच्या दुःखाची कमी-जास्त तीव्रता लेखिकेने आपल्या शब्दसामर्थ्यांने चित्रित केली आहे व त्या स्त्रियांचे भावविश्व वाचकांच्या नजरेसमोर उभे केले आहे, परंतु असे करताना त्या स्त्राrवादी होत नाहीत. स्त्राr ही प्रथम माणूस आहे आणि माणूस म्हणून त्या मानवी दुःखाचे मूळ शोधण्याचा लेखिकेने प्रयत्न केला आहे हे उल्लेखनीय आहे.

या कथा मध्यमवर्गीय सुशिक्षित संसारी स्त्रियांच्या जीवन कहाण्या आहेत आणि म्हणूनच त्या आपल्याला जवळच्या, आपल्याशा वाटतात. ‘रिकन्स्ट्रक्शन’, ‘कवडशांचे फूल’, ‘हरवलेले साम्राज्य’ या कथा अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीने स्त्राr दुःखाचे विविध चेहरे समोर ठेवतात. ‘औटघटकेची राणी’ ही एक चांगली कथा. तपशील देणारी आणि कवितेसारखी बारकाईने वाचायला लावणारी कथा आहे. ‘सावलीखालचं उन्ह’ ही कथा एका प्रौढवयीन शिक्षिकेची  हृद्य कहाणी आहे. आपण केलेल्या विधायक कार्याचा अहवाल वाचनात मुख्याध्यापिकांनी साधा उल्लेखही केला नाही म्हणून व्यथित झालेली एक ज्येष्ठ शिक्षिका या कार्पामानंतर पायी घरी जात असताना तिला भेटणाऱया विद्यार्थ्यांच्या भेटीतून तिला आपल्या कार्याची खरी पोचपावती मिळते. जर आपल्या विद्यार्थ्यांच्या  मनात आपण जिवंत आहोत, प्रेरक आहोत तर त्यापुढे रुक्ष अहवालातील लहानशी नोंद आपणासाठी कवडीमोल असली पाहिजे हे सत्य शिक्षकेला उमगते. लेखिकेने ते किती सुंदर शब्दांत सांगितले आहे बघा –

‘…आणि स्वच्छ वस्त्रासारख्या लख्ख होऊन त्या रिक्षात बसल्या. म्हणाल्या, “चला.”

या कथांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेखिकेची ‘चित्रदर्शी शैली.’ ही शैली तपशील देणारी आहे. चित्रात्मक व संवादी आहे. या शैलीची अनेक उदाहरणे कथांमधून ठिपक्या ठिपक्यांच्या रांगोळीगत विखुरली आहेत. थोडीच वाक्ये वानगीदाखल देते…

‘स्वयंपाकघरात भांडी भरून पोती बांधून ठेवली होती. नको असलेल्या पितळी भांड्याचा एक ढीग एका जुन्या साडीत बांधून बाजूला ठेवला होता. सासूबाईंची वेगवेगळ्या घाटांची जपून ठेवलेली पितळी भांडी खाटकाकडे चालवलेल्या गायीसारखी त्या गाठोड्यात निमूट बसली होती.’, ‘फणसाच्या गऱयाला चिकटून एखादा साकूळ येतोच तसं त्या हसण्याला चिकटून काहीतरी व्याकूळ करणारं आलं.’,  ‘रात्री झोपण्यापूर्वी सासूबाईंनी अभिमानाने सगळ्या भिंतींवरून हात फिरवला होता, भरून आलेल्या कणसांवर शेतकऱयाने फिरवावा तसा!’ या पुस्तकाचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे सुंदर निर्मिती आणि अंतर्गत सजावट. कथांच्या मर्माला उठाव देणारी चित्रकार संतोष घोंगडे यांची सुंदर रेखाटने आणि सुविख्यात चित्रकार श्रीधर अंभोरे यांचे अप्रतिम मुखपृष्ठ म्हणजे या पुस्तकाच्या जमेच्या बाजू आहेत.

कवडशांचे फूल

प्रकाशन : संजीवनी बोकील, दिलीपराज

पृष्ठे : 144   मूल्य : 300 रुपये

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;