नोटाबंदी काळे धन सफेद करण्यासाठीच – न्यायमूर्ती नागरत्ना
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बी व्ही नागरत्ना यांनी हैदराबादमध्ये ‘कोर्ट्स अँड कॉन्स्टिट्युशन’ परिषदेच्या उद्घाटन सत्रात नोटाबंदीवर प्रश्न उपस्थित केला आहे. जर नोटाबंदीनंतर 80 टक्के पैसा परत आला तर मग काळे धन गेले कुठे असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला आहे. तसेच नोटा बंदी हा काळा पैसा सफेद करण्याचा एक मार्ग होता, असे देखील त्या म्हणाल्या.
8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्यात आल्या तेव्हा काय घडले हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्या वेळी 500 आणि 1000 च्या नोटांचा 86% वापर सुरू होता, न्यायमूर्ती नाग रत्न म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List