मद्य धोरण घोटाळा, आपचे मंत्री कैलास गहलोत यांची पाच तास चौकशी
दिल्लीचे मंत्री व आप नेते कैलास गहलोत यांची शनिवारी मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने पाच तास चौकशी केली. ईडीने त्यांनी मद्य धोरण घोटाळ्यातील मनी लाँडरिंग प्रकरणी नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले होते.
कैलाश गहलोत यांची ईडी चौकशी संपल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ”मला जे काही प्रश्न विचारले त्या सर्वांची मी उत्तर दिली आहेत. मला सरकारी बंगला मिळालेला असतानाही मी माझ्या खासगी निवासस्थानी राहतो. माझा गोव्यातील निवडणूक प्रचाराशी देखील काहीच संबंध नाही. मला तिथे काय घडले हे देखील माहित नाही, असे गहलोत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List