जिगरबाज रणरागिणी! सुनिता केजरीवाल-कल्पना सोरेन यांची भेट; आदित्य ठाकरेंनी केले कौतुक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. तर कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली आहे. शनिवारी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली. कल्पना या शनिवारी दुपारी केजरीवाल यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. त्यांच्या भेटीचा भावूक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या भेटीचा व्हिडीओ शेअर करत भाजपच्या हुकुमशाहीवर टीका केली आहे. तसेच त्यांनी या पोस्टमधून दोन्ही मुख्यमंत्री पत्नींचे कौतुक केले आहे. ”कल्पना सोरेन व सुनीता केजरीवाल या दोन जिगरबाज धाडसी महिला आहेत. त्यांना माहित आहे की त्यांचे पती हे विरोधक असल्याने व सरकारपुढे झुकायला त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलीय. आपला देशातील लोकशाही व संविधान खऱ्या अर्थाने सध्या धोक्यात आले आहे. पण संपूर्ण देश हा अरविंद केजरीवाल व हेमंत सोरेन या आदर्श नेत्यांसोबत आहे. संपूर्ण जग बघतंय की कशाप्रकारे आपल्या देशातील लोकशाही खाली खेचली जातेय व आपण सर्व लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत,

गेल्या आठवड्यात हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्याशी संवाद साधत त्यांना धीर दिला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;