दिल्ली-मेरठ महामार्गावर स्कूल व्हॅन डंपरला धडकली; चालकासह एका मुलाचा मृत्यू, 9 जण जखमी
दिल्ली- मेरठ महामार्गावर गाजियाबाद क्रॉसिंगजवळ शनिवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. भरधाव स्कूल व्हॅनने एका डंपरला मागून धडक दिली आहे. या अपघातात व्हॅन चालकासह एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर 9 मुले जखमी झाली आहेत. या स्कूल व्हॅनमधून चालकासह 11 मुले प्रवास करत होती. ती सर्व मुले 10 ते 13 वर्षांमधील आहेत. स्कूल व्हॅन अमरोहा येथून जामिया युनव्हर्सिटीकेड जात होती. त्यावेळी रस्त्याच्याकडेला थांबलेल्या डंपरला ओव्हरटेक करताना भरधाव स्कूल व्हॅनने डंपरला धडक दिली.
स्कूल व्हॅनमधील विद्यार्थी सहावीसाठी इंट्रन्स परीक्षा देण्यासाठी जात होते. अपघातानंतर जखमी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघात कशामुळे झाला, याचा तपास करण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List