Lok Sabha election 2024 – हेमा मालिनींविरोधात रिंगणात उतरणार बॉक्सर विजेंद्र सिंह?
भाजपविरोधात इंडिया आघाडीचे तगडे आव्हान आहे. त्यामुळे लोकसभेच्या प्रत्येक जागेसाठी इंडिया आघाडीकडून सक्षम उमेदवार मैदानात उतरवला जात आहे. उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीत काँग्रेसला 17 जागा मिळाल्या आहेत. त्यातील 13 जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर उर्वरीत चार जागांसाठी उमेदवारांच्या नावावर विचरमंथन सुरू आहे.
उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. या जागेवर भाजपने या जागेवर दोनदा विजयी झालेल्या हेमा मालिनी यांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे. त्या विजयाची हॅटट्रिक करतील, असा विश्वास भाजपला आहे. मात्र, त्यासाठी काँग्रेसही तुल्यबळ उमेदवाराला रिंगणात उतरवणार आहे. या जागेवर हेमा मालिनी यांच्याविरोधात बॉक्सर विजेंद्र सिंह याला मैदानात उतरवण्याचा विचार काँग्रेसकडून सुरू आहे. त्यामुळे मथुरा, अमेठी आणि रायबरेलीमध्ये काँग्रेसचे उमेदवार कोण असेल, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List