सिनेमासाठी मिळालेला नॅशनल अवॉर्ड चोरीला गेला तेव्हा…; नागराज मंजुळेंचे विचार तुम्हाला प्रेरणा देतील

सिनेमासाठी मिळालेला नॅशनल अवॉर्ड चोरीला गेला तेव्हा…; नागराज मंजुळेंचे विचार तुम्हाला प्रेरणा देतील

मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हालाखीच्या परिस्थितीतून स्वत:ला उभं केलं. अनेकदा अपयश आल्यानंतर नागराज मंजुळे यांनी प्रचंड यशही अनुभवलं आहे. एका मुलाखती दरम्यान नागराज मंजुळे त्यांच्या जीवनातील यश-अपयशावर बोलते झाले. अनेकदा अपयश पचवल्यानंतर नागराज मंजुळे यांनी ‘पिस्तुल्या’ सिनेमा केला. या सिनेमासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला. मात्र हा अवॉर्ड चोरीला गेला. यानंतर नागराज मंजुळे अतिशय शांतपणे व्यक्त झाले. त्यांची जी प्रतिक्रिया होती. त्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल.

अन् नॅशनल अवॉर्ड चोरीला गेला…

फॅन्ड्री सिनेमाचं शुटिंग होतं. शुटिंगचा शेवटचा दिवस होता. म्हणून मी आईला शुटिंगला बोलावलं होतं. पण त्याच दिवशी आमच्या घरात चोरी झाली. तेव्हा ‘पिस्तुल्या’ सिनेमासाठी मिळालेला नॅशनल अवॉर्ड चोरीला गेला. माझ्या भावाने मला या चोरीबद्दल सांगितलं. ही चोरी झाली तेव्हा माझी आई घरी होती. म्हणून मग मी आधी विचारलं ती कशी आहे. तिला काही झालं तर नाही ना… याची मी आधी चौकशी केली, असं नागराज यांनी सांगितलं.

नागराज काय म्हणाले?

मग मी विचार केला की चोराला कधी नॅशनल अवॉर्ड मिळणार? म्हणून मग म्हटलं झालं ते झालं… चोरांना कदाचित माहितही नसेन की तो नॅशनल अवॉर्ड आहे म्हणून… त्यांना वाटलं असेल की काही तरी चांदीचं आहे. म्हणून त्यांनी ते नेलं असेल… पण त्याचं पुढे काय झालं असेल ते त्यांनाच माहिती… ते कुणाला विकलं असेल की ते कुठे पडून असेन माहिती नाही, असं नागराज मंजुळे म्हणाले.

अनेकांना वाटलं की मला याचं वाईट वाटलं असेल. कवी किशोर कदम मला म्हणाले की तुला वाईट वाटलं असेल. पण पुढच्या फॅन्ड्री सिनेमाला तुला अवॉर्ड मिळेल. पण मला हे अवॉर्ड मिळावं म्हणून मी काम नाही करत. पण पिस्तुल्याला नॅशनल अवॉर्ड मिळेल, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मी विसरून गेलो होतो. तेव्हा तो नॅशनल अवॉर्ड मिळाला. माझ्या भावाला पण खूप वाईट वाटलं. पण मी त्यालाही म्हटलं की, चोराला कुठं नॅशनल अवॉर्ड मिळतं? जाऊ दे तू कशाला टेन्शन घेतो. असं मी माझ्या भावाला समजावलं, असं नागराज मंजुळे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;