Amitabh Bachchan यांच्या आयुष्यातील ‘ते’ 41 दिवस, कुटुंबापासून दूर बिग बीचां संन्यासाची कहाणी काय होती?

Amitabh Bachchan यांच्या आयुष्यातील ‘ते’ 41 दिवस, कुटुंबापासून दूर बिग बीचां संन्यासाची कहाणी काय होती?

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. बिग बी यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रा पार देखील आहे. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत सिनेमांच्या कथेला अमिताभ बच्चन यांनी वेगळं वळण दिलं. अमिताभ बच्चन यांच्या सिनेमांप्रमाणेच त्यांचं खासगी आयुष्य देखील एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणेच आहे. अमिताभ बच्चन यांच्या खासगी आयुष्यातील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत. बिग बी यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी माहिती झाल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल..

अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात एक टप्पा असा होता, जेव्हा त्यांनी कुटुंब आणि रॉयल लाईफस्टाईलचा त्याग करत संन्यास घेतला होता. 1984 साली प्रदर्शित झालेल्या ‘शराबी’ सिनेमाच्या दरम्यान झालेल्या एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर मौन सोडलं. मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी त्रिदंडी संन्यास घेतला होता का? असा प्रश्न विचारला होता.

संन्यास घेतल्याच्या प्रश्नावर होकार देत अमिताभ बच्चन म्हणाले, ‘मी त्रिदंडी संन्यास घेतला होता. यामध्ये 41 दिवस उपवास ठेवला जातो. कुटुंबापासून देखील दूर राहावं लागतं. एवढंच नाहीतर, दारू आणि मांसाहार सोडावा लागतो, अनवाणी राहाव लागतं आणि भगवी वस्त्रे परिधान करावी लागतात. जमीनीवर झोपावं लागतं… याला एक प्रकारे संन्यासच म्हणतात…’ याच एका गोष्टीमुळे बिग बी तेव्हा तुफान चर्चेत आले होते.

अमिताभ बच्चन यांनी घेतला होता त्रिदंडी संन्यास ?

अमिताभ बच्चन म्हणाले, ‘माझा कोणता नवस नव्हता… माझे काही मित्र असं करत होते. त्यामुळे त्यांना पाहून मी देखील त्रिदंडी संन्यास घेण्याचा विचार केला… त्यानंतर मला प्रचंड आनंद झाला होता…’ असं देखील अमिताभ बच्चन म्हणाले होते. सागंयचं झालं तर, अमिताभ बच्चन कायम मुलाखती, ब्लॉग आणि त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रोफेशनल, खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

अमिताभ बच्चन यांचे आगामी सिनेमे

वयाच्या 81 व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. काही दिवसांपूर्वी बिग बी ‘गणपत’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले होते. सिनेमात बिग बींसोबत टायगर श्रॉफ आणि कृती सनॉन यांनी देखील मुख्य भूमिका साकराली होती. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेट ठरला.. आता बिग बी The Umesh Chronicles, कल्कि 2898 AD, बटरफ्लाय आणि Vettaiyan सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;