पुन्हा कधी गाऊ नकोस..; परिणीती चोप्राचं गाणं ऐकून नेटकऱ्यांचा सल्ला

पुन्हा कधी गाऊ नकोस..; परिणीती चोप्राचं गाणं ऐकून नेटकऱ्यांचा सल्ला

बॉलिवूडमध्ये असे बरेच सेलिब्रिटी आहेत, ज्यांना अभिनयाशिवाय गायनातही रस आहे. अभिनेत्री आलिया भट्ट, श्रद्धा कपूर, परिणीती चोप्रा यांसारख्या अभिनेत्रींनी त्यांच्या चित्रपटांमध्ये गाणीसुद्धा गायली आहेत. इतकंच नव्हे तर लग्नानंतर परिणीतीने गायन क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं आहे. मात्र सोशल मीडियावर नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती तिच्या आगामी ‘अमर सिंह चमकीला’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात स्टेजवर गाताना दिसत आहे. मात्र परिणीतीचं गाणं नेटकऱ्यांना फारसं पसंत पडलं नाही. त्यामुळे अनेकांनी तिला यापुढे न गाण्याचा सल्ला दिला आहे.

दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा यांचा ‘अमर सिंह चमकीला’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दिलजीतसोबत स्टेजवर उभ्या असलेल्या परिणीतीने एक पंजाबी गाणं गाऊन दाखवलं. मात्र परिणीतीला गायन जमलं नसल्याचं अनेकांनी म्हटलंय. ‘परिणीतीने तिची ही छुपी प्रतिभा छुपीच ठेवावी’, असं एकाने लिहिलंय. तर ‘आज गाने की जिद ना करो’, अशी उपरोधिक कमेंट दुसऱ्या युजरने केली आहे. ‘झोपेतून उठण्यासाठी ही सर्वोत्तम अलार्म रिंगटोन असेल’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी परिणीतीच्या गायनाची खिल्ली उडवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shadab Shaikh (@shadabshaikh_2361)

परिणीती गात असताना बाजूला उभ्या असलेल्या दिलजीतच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून त्यावरुनही अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. परिणीतीने याआधीही अनेकदा गाणी गायली आहेत. तिच्या गायनकौशल्याचं अनेकांकडून कौतुक झालंय. मात्र या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात तिला गाणं जमलंच नाही, असंही काहींनी म्हटलंय. परिणीतीने 2017 मध्ये ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं होतं. तिच्या आवाजातील ‘माना के हम यार नहीं’ हे गाणं आजही लोकप्रिय आहे. परिणीतीने ‘केसरी’ या चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ हे गाणंसुद्धा आपल्या आवाजात रेकॉर्ड करून प्रदर्शित केलं होतं. इतकंच नव्हे तर स्वत:च्या लग्नासाठीही तिने खास गाणं रेकॉर्ड केलं होतं. ‘ओ पिया’ हे गाणं रिलीज करून तिने पतीला सरप्राइज दिलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;