भाजप सरकार आणखी 10 हजार कोटींचे निवडणूक रोखे छापणार होते! मोठी माहिती उघड

भाजप सरकार आणखी 10 हजार कोटींचे निवडणूक रोखे छापणार होते! मोठी माहिती उघड

गेल्या काही दिवसांपासून निवडणूक रोख्यांचा विषय चर्चेत आहे. निवडणूक रोखे हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. त्यातच आता आणखी एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालायने निवडणूक रोखे योजना असंवैधानिक असल्याचे सांगत ही योजना बंद करण्याचा आदेश दिले होते. त्याच्या तीन दिवस आधीच केंद्र सरकारने 10 हजार कोटींचे निवडणूक रोखे छापण्यास मंजुरी दिली होती. प्रत्येकी एक कोटी रुपये किमतीचे रोखे छापण्याचे आदेश शासकीय प्रिटिंग कंपनी SPMCIL ला देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या ही योजना बंद करण्याच्या आदेशानंतर 13 दिवसांनी 28 फेब्रुवारीला अर्थ मंत्रालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला निवडणूक रोख्यांची छपाई रोखण्याचे आदेश दिले होते..

अर्थ मंत्रालय आणि एसबीआय यांच्यातील पत्रव्यवहार, ईमेल मधील नोंदीमधून ही माहिती उघड झाली आहे. तसेच SPMCIL ने आधीच 8350 रोख्यांची छपाई करून ते स्टेट बँक ऑफ इंडियाकडे पाठवले असल्याचेही नोंदीमधून उघड झाले आहे. द इंडियन एक्सप्रेसला माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मिळाली आहे. निवडणूक रोख्यांची योजना सुरू झाल्यापासून एकूण 22,217 निवडणूक रोखे वितरीत करण्यात आले. त्यापैकी भाजपकडे 8,451 कोटी, काँग्रेस 1,950 कोटी, तृणमूल काँग्रेस 1,707.81 कोटी आणि बीआरएसकडे 1,407.30 कोटींचे निवडणूक रोखे देण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने ही योजना बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर 13 दिवसांनी अर्थ मंत्रालयाने नव्या निवडणूक रोख्यांची छपाई थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर एसबीआयकडून SPMCIL ला छपाई थांबवण्याबाबत ईमेल पाठविण्यात आला. एसबीआय बँकेच्या व्यवहार बँकिंग विभागाच्या सहाय्यक महाव्यवस्थापकांनी SPMCIL ला पाठविलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, 23 फेब्रुवारी 2024 रोजी 8,350 निवडणूक रोख्यांच्या चार बॉक्सची पावती आम्ही स्वीकारली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आम्ही आपल्याला विनंती करतो की, उरलेल्या 1,650 निवडणूक रोख्यांची छपाई थांबवण्यात यावी.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;