नवाब मलिक यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

नवाब मलिक यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती खालावली आहे. कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार आणि उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याप्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी सुरू होती. सध्या ते वैद्यकीय जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याची माहिती त्यांची मुलगी सना मलिक हिने शनिवारी दिली. त्यानंतर त्यांना कुर्ला येथील रुग्णालयात आप्तकालीन कक्षात दाखल करण्यात आले आहे.

डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. त्यांना श्वसनासंदर्भात त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुर्ला येथील क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीने त्यांना अटक केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित प्रकरणात नवाब मलिक यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार करणे तसेच त्याच्या बहिणीशी जमीन व्यवहार करण्यासंदर्भात ईडीकडून त्यांची चौकशी सुरु होती.अटक केल्यानंतर अनेक दिवस ते तुरुंगात होते. काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणामुळे त्यांना जामीन मिळाला होता. प्रकृती अस्वस्थामुळे सध्या ते राजकीय कार्यक्रमांपासून दूर आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;