एप्रिलमध्ये OTT वर प्रदर्शित होणार हे दमदार चित्रपट, वेब सीरिज
क्रुक्स- हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या 4 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. एका अमूल्य नाण्यामुळे संपूर्ण युरोपाच्या शत्रूगटात कशी फूट पडते, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
अमर सिंह चमकीला- दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा यांचा 'अमर सिंह चमकीला' हा चित्रपट 12 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. निर्माते आणि दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा हा चित्रपट अमिर सिंह चमकीला यांच्या आयुष्यावर आधारित आहे.
पॅरासाइट द ग्रे- या चित्रपटाच्या कथेविषयी बोलायचं झाल्यास, यामध्ये दाखवण्यात आलंय की कशाप्रकारे काही अज्ञात पॅरासाइट हिंसक पद्धतीने माणसावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. 5 एप्रिल रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
हनुमान- तेजा सज्जाची मुख्य भूमिका असलेल्या 'हनुमान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. 40 कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने तब्बल 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला होता. आता ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट 5 एप्रिलपासून पाहता येणार आहे. झी 5 वर या चित्रपटाचे कन्नड आणि मल्याळम व्हर्जन उपलब्ध असतील तर डिस्ने प्लस हॉटस्टारवर तमिळ व्हर्जन पहायला मिळेल.
फर्रे- सलमान खानची भाची अलीजेह अग्निहोत्रीचा पहिलावहिला चित्रपट 'फर्रे' ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 5 एप्रिल रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.







Comment List