Miami Open 2024 – बोपन्ना-एबडन जोडी पुन्हा जेतेपदासमीप

Miami Open 2024 – बोपन्ना-एबडन जोडी पुन्हा जेतेपदासमीप

वर्षाच्या प्रारंभीच रोहन बोपन्ना आणि ऑस्ट्रेलियन मॅथ्यू एबडनने ऑस्ट्रेलियन पुरूष दुहेरीचे ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याची किमया साधली होती. आता पुन्हा एकदा ते जेतेपदाच्या समीप पोहोचले आहेत. मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मार्पेल ग्रॅनोलर्स आणि होरासियो जेबालोस जोडीचा सरळ सेट्समध्ये पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. आता जेतेपदासाठी ते क्रोएशियन इव्हान डोडिग आणि अमेरिकन ऑस्टिन क्रॅझिकेक या जोडीशी भिडतील.

बोपन्ना-एबडन जोडीला उपांत्य फेरीत विजयासाठी फार संघर्ष करावा लागला नाही. त्यांनी ग्रॅनोलर्स आणि जेबालोस जोडीचा 6-1, 6-4 असा सहज पराभव केला. या विजयामुळे पुन्हा ते जागतिक क्रमवारीत अक्वल स्थानी झेप घेण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी दुबईत झालेल्या टेनिस स्पर्धेत त्यांना उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का बसल्याने ते क्रमवारीत दुसऱया क्रमांकावर घसरले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;