Bharat Ratna – नरसिंह राव, चरणसिंह, कर्पुरी ठाकूर, स्वामीनाथन मरणोत्तर भारतरत्नाने सन्मानित

Bharat Ratna – नरसिंह राव, चरणसिंह, कर्पुरी ठाकूर, स्वामीनाथन मरणोत्तर भारतरत्नाने सन्मानित

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे डॉ. एम. एस. स्वामीनाथन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना आज मरणोत्तर भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांनी हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार स्वीकारला.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनाही आजच भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार होता. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव ते आज राष्ट्रपती भवनामध्ये उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना उद्या 31 मार्च रोजी घरी जाऊन सन्मानित केले जाणार आहे. अडवाणी यांच्याव्यतिरिक्त उर्वरित चौठघांना मरणोत्तर भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले.

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांचा मुलगा पी.व्ही. प्रभाकर राव, एम.एस स्वामीनाथ यांची मुलगी डॉ. नित्या राव, कर्पुरी ठाकूर यांचा मुलगा रामनाथ ठाकूर आणि चौधरी चरण सिंह यांचा नातू जयंत चौधरी यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;