पुरुष कलाकार आठ तासांचीच शिफ्ट करतात, दीपिका पदुकोणने फिल्म इंडस्ट्रीला दाखवला आरसा
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने आठ तासांच्या शिफ्टची मागणी केल्यानंतर तिला दोन मोठ्या चित्रपटांतून वगळण्यात आले आहे. सर्वात आधी संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ आणि नाग अश्विन यांच्या ‘कल्की-2’ हे दोन्ही चित्रपट दीपिकाच्या हातातून गेले, परंतु मी आठ तासांच्या शिफ्टची जी मागणी केली, त्यात नवीन काही नाही. चित्रपट इंडस्ट्रीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून पुरुष सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे अनेक जण आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करत आलेले आहेत. त्यांना कोणी प्रश्न केले नाहीत, असा संताप दीपिकाने व्यक्त केला आहे.
मला माहिती आहे की, मी एक महिला आहे. त्यामुळे माझ्यावर दबाव टाकला जात आहे, परंतु मी सांगू इच्छिते की, मी जे काही बोलले ते नवीन नाही किंवा गुपित नाही. हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीत वर्षानुवर्षे पुरुष सुपरस्टार्स केवळ आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करतात. त्यांना कधी कोणी प्रश्न विचारल्याचे मला दिसले नाही. मला कोणाचे नाव घ्यायचे नाही किंवा मुद्दा बनवायचा नाही, परंतु अनेक असे कलाकार आहेत ते केवळ आठ तास काम करतात, तसेच सोमवार ते शुक्रवार काम करतात. विकेंडला ते काम करत नाहीत. यावर कोणी कधी बोलले नाही, असे सांगत दीपिकाने फिल्म इंडस्ट्रीला आरसा दाखवला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List