राज्यात दोन दिवस वादळी पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट, मुंबईत ‘जोरधार’ सुरूच

राज्यात दोन दिवस वादळी पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट, मुंबईत ‘जोरधार’ सुरूच

राज्यात आठवडाभर उकाडय़ाने नागरिक हैराण झाले असताना पुढील दोन दिवस गडगडाटासह वादळी पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामध्ये मुंबईसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. मुंबईतही पावसाने आज सायंकाळी जोरदार बरसून वर्दीच दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱयानुसार पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळणार आहेत. मुंबईतही तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान 26 अंशांपर्यंत राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही काही जिह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मात्र विदर्भात कोरडे वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याने कळवले आहे. पावसामुळे उकाडय़ाने हैराण झालेल्यांना काहीसा दिलासा मिळणार असला तरी शेतकऱयांचे टेन्शन वाढले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;