म्हातारपण दिसून येतंय.. सलमान खानच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

म्हातारपण दिसून येतंय.. सलमान खानच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान हा अनेकांचा आवडता कलाकार आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात असे असंख्य चाहते आहेत, जे त्याचे चित्रपट आवर्जून पाहतात. सलमान हा काहींसाठी त्यांचा लहानपणीचा क्रश आहे, तर काहींसाठी तो बॉलिवूडमधला सर्वांत आवडता अभिनेता आहे. वयोमानानुसार सेलिब्रिटींच्याही लूकमध्ये बराच बदल होताना दिसतो. त्यामुळे अनेक वर्षांपासून आपण ज्या सेलिब्रिटीला फॉलो करतोय, ज्यांचे चित्रपट पाहतोय.. त्यांचा वयानुसार बदललेला लूक पाहिलं की वेळ पटकन निघून गेल्याचा भास होतो. असंच काहीसं अभिनेता सलमानच्या चाहत्यांसोबत झालंय. सलमान आता 58 वर्षांचा आहे. बॉलिवूडचा ‘दबंग’ खान नेहमीच त्याच्या फिटनेसमुळे ओळखला जातो. मात्र त्याच्याही चेहऱ्यावर आता वय दिसून येऊ लागलंय.

सलमानचा हा नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसतोय. पापाराझी अकाऊंटवर सलमानचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘माझा लहानपणीचा क्रश हा म्हातारा होतो’, असं एकाने लिहिलं. तर ‘सलमानचं वय आता चेहऱ्यावर दिसू लागलंय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘सर्वांचं वय होतं, यात नवीन काहीच नाही’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. काहींनी सलमानला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सलमान बॉलिवूड इंडस्ट्रीत गेल्या 30 वर्षांहून अधिक काळापासून काम करतोय. आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटांशिवाय तो ‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोचं सूत्रसंचालनसुद्धा करतो. भाऊ अरबाज खान निर्मित ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला त्याने हजेरी लावली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना सलमानने दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांचा उल्लेख केला. निधनापूर्वी सतीश कौशिक हे ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाचं शूटिंग करत होते. त्यामुळे चित्रपटात त्यांचीही भूमिका पहायला मिळणार आहे.

सलमानच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास ‘टायगर व्हर्सेस पठाण’ या चित्रपटात तो शाहरुख खानसोबत काम करताना दिसणार आहे. त्याचसोबत त्याचा ‘किक 2’ हा बहुचर्चित चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या वर्षी त्याचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘टायगर 3’ अशी या चित्रपटांची नावं आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;