हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है; रोहित पवार यांचे सूचक विधान
निलेश लंके यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा देत अजित पवार गटाची साथ सोडली. नगर-दक्षिण मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी फुंकल्याने नगर जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठा हादरा बसला. लंके सोबत आल्याने बळ मिळालेल्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही राजकीय घडामोडींवर एक सूचक विधान केले.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रोहित पवार यांनी हा फक्त ट्रेलर असून पिक्चर अभी बाकी है, असे म्हटले. त्यांच्या या विधानामुळे अजित पवार गटाचे आणखी काही आमदार शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे.
निलेश लंके यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला असून ते नगर-दक्षिणचे उमेदवार असणार आहे. येथे जबरदस्त वातावरण असून एवढ्या बलाढ्य शक्तीविरोधात साधा कार्यकर्ता उभा राहतोय. ते काही काळ अजित दादांबरोबर होते. पण तिथे मन रमत नसल्याने त्यांनी मतदारसंघातील लोकांशी चर्चा केली. लोकं शरद पवारांसोबत असल्याने त्यांनी आपल्यासोबत येण्याचा निर्णय घेतला असून ही फक्त सुरुवात आहे. हा ट्रेलर असून पिक्चर अभी बाकी है, असे रोहित पवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List