‘मन धागा धागा जोडते नवा’मध्ये आनंदीच्या हळदीचे गोड क्षण
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेतल्या सार्थक-आनंदीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
सार्थक आनंदीवर जीवापाड प्रेम करतो. आपल्या प्रत्येक कृतीतून आनंदीवरचं प्रेम आणि तिच्याविषयी वाटणारा आदर तो व्यक्त करत असतो. सार्थकच्या आग्रहाखातर आता त्याच्या आईने आनंदीला सून म्हणून सिद्ध करण्याची एक संधी दिली आहे.
स्वत:मध्ये सकारात्मक बदल करत आनंदी आयुष्याची नव्याने सुरुवात करण्यास सज्ज झाली आहे. या मालिकेत आनंदी आणि सार्थकची हळद पार पडणार आहे. हळदीच्या कार्यक्रमासाठी आनंदीने पिवळ्या आणि गुलाबी रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List