अमेरिकन क्रिकेट संघाला हिंदुस्थानी ताकद; टी-20 वर्ल्ड कप संघात हिंदुस्थानी वंशाचे आठ क्रिकेटपटू

अमेरिकन क्रिकेट संघाला हिंदुस्थानी ताकद; टी-20 वर्ल्ड कप संघात हिंदुस्थानी वंशाचे आठ क्रिकेटपटू

आयसीसीच्या वर्ल्ड कपमध्ये प्रथमच सहभागी होत असलेल्या अमेरिकन क्रिकेट संघाला हिंदुस्थानी वंशाच्या खेळाडूंची ताकद लाभली आहे. जून महिन्यात अमेरिका आणि पॅरेबियन बेटांवर होणार्या टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 सदस्यीय संघात चक्क आठ खेळाडू हे हिंदुस्थानी वंशाचेच नसून त्यापैकी पाच खेळाडू हिंदुस्थानात जन्मलेले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेन संघाच्या कर्णधारपदाची माळ हिंदुस्थानी वंशाच्या मोनांक पटेल या खेळाडूच्याच गळय़ात पडली आहे.

जून महिन्यात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 55 सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना हा 2 जून रोजी अमेरिका आणि पॅनडा यांच्यात रंगणार आहे. प्रथमच अमेरिकन क्रिकेट संघ टी-20 विश्वचषकात खेळताना दिसणार आहे.

हिंदुस्थानातील गुजरात येथील मोनांक पटेल याला 2010 मध्ये अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळाले. 2016 पासून मोनांक अमेरिकेत स्थायिक झाला. 2018 पासून त्याने अमेरिकेसाठी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्याच वर्षी तो आयसीसी वर्ल्ड टी-20 अमेरिका पात्रता स्पर्धेसाठी क्रिकेट खेळला. या स्पर्धेत त्याने सहा सामन्यांत एकूण 208 धावा केल्या. पटेल 2021 पासून अमेरिकेच्या संघाचा कर्णधार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी अमेरिका पॅनडासोबत टी-20 मालिका खेळणार असून या स्पर्धेसाठीदेखील अमेरिकन क्रिकेट बोर्डाने संघ जारी केला आहे.

यूएस संघः मोनांक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स (उपकर्णधार), अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, गजानंद सिंग, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोस्तुश पेंजिगे, सौरभ नेत्रावळकर, शेडली व्हॅन शॅकविक, स्टीव्हन टेलर, उस्मान रफिक.

अमेरिकन नव्हे अर्ध हिंदुस्थानी संघ

अमेरिकेत मोठय़ा संख्येने हिंदुस्थानी नागरिक राहत असल्यामुळे क्रिकेटच्या संघात हिंदुस्थानी वंशाचेच खेळाडू असणार हे साहजिकच होते. कर्णधार मोनांक पटेल, हरमीत सिंग, निसर्ग पटेल, सौरभ नेत्रवाळकर, मिलिंद कुमार हे पाच खेळाडू हिंदुस्थानात जन्मले असून काही वर्षांपूर्वी कामानिमित्त तसेच क्रिकेट खेळण्यासाठी अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. सौरभ नेत्रवाळकर आणि हरमीत सिंग हे दोघे तर मुंबईच्या रणजी संघातही होते. तसेच मिलिंद कुमार हा दिल्लीच्या संघात होता. त्यामुळे हिंदुस्थानात संधी मिळत नसल्यामुळे हे क्रिकेटपटू अमेरिकन संघाच्या आश्रयाला गेले आहेत. त्याचप्रमाणे पाकिस्तानचा उस्मान रफिक हासुद्धा अमेरिकन संघाचा भाग झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;