Jalna News – कंत्राटदाराच्या घरावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीचा पर्दाफाश, चंदनझिरा पोलिसांची कामगिरी

Jalna News – कंत्राटदाराच्या घरावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीचा पर्दाफाश, चंदनझिरा पोलिसांची कामगिरी

कंत्राटदाराच्या घरावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीचा जालन्यातील चंदनझिरा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यात सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून दरोडेखोरांकडून गावठी पिस्तुलासह धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

जालना शहरातील प्रतिष्ठितांची वसाहत म्हणून ओळख असलेल्या श्रीकृष्ण रुख्मिणीनगर येथील ठेकेदार शैलेश देवीदान यांच्या घरात १६ ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री ८ ते १० दरोडेखोरांनी हातात गावठी पिस्तुल, कोयता, चाकू, लोखंडी टॉमी घेऊन स्वयंपाक घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला होता. त्यावेळी पहारेकर्‍यास जाग आल्याने त्याने आरडाओरड करीत प्रतिकार केला होता. त्यानंतर दरोडेखोर तेथून पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी पोलीस कर्मचार्यांसह तात्काळ दाखल झाले होते. त्यांनी तपासचक्रे तातडीने फिरवत पोलीस तपास पथके तैनात केली होती. पोलीस पथकाने या गुन्ह्याचा तांत्रिकदृष्ट्या तपास करून, या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधारासह टोळीचा पर्दाफाश केला असून, ६ अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अट्टल गुन्हेगार सचिन कैलास गायकवाड (२३), सुरज कैलास गायकवाड (३०), रमण भगीरथ गौड (४५), अजय राजेंद्र दांडगे (२४), प्रवीण संजय पवार (२५, सर्व रा. जालना), आकाश सर्जेराव गायकवाड (२४, रा. पिरपिंपळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, या गुन्ह्यात एका विधिसंघर्ष बालकाचा देखील समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या टोळीमधील आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. अटकेतील ६ आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या टोळीने नवीन जालना भागातही एका उद्योजकाच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक बन्सल यांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह तपास पथकाचे कौतुक केले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक एम. बी.स्कॉट, रवी देशमाने, पोलीस अंमलदार मनसुब वेताळ, कृष्णा तंगे, प्रशांत देशमुख, रवी देशमुख, राजू पवार, साई पवार, संतोष वनवे, अशोक जाधव, जितेंद्र तागवाले, समाधान उगले, अभिजित वायकोस, राजू मोरे, अनिल चव्हाण, सतीश देशमुख, सागर खैरे, दीपक डेहंगळ, गजानन काकडे, सागर बावीस्कर आदींनी पार पाडली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;