दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले दिल्लीच्या जुन्या मिठाईच्या दुकानात, व्हिडीओ शेअर करत अनुभव लिहीला

दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले दिल्लीच्या जुन्या मिठाईच्या दुकानात, व्हिडीओ शेअर करत अनुभव लिहीला

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.नुकतेच राहुल गांधी जुन्या दिल्लीच्या एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानावर पोहोचले. तिथे त्यांनी मिठाई बनवली आणि बेसनचे लाडूही बनवले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

कधी दिल्लीच्या प्रसिद्ध चाटच्या दुकानात स्वाद घेताना तर कधी लंडनच्या प्रसिद्ध कॅफेत कॉफी घेताना दिसतात. त्यांची खवय्येगिरी सर्वांनाच प्रचिती आहे. आता देशभरात दिवाळीचा सण सुरु आहे. अशातच राहुल गांधी दिवाळी निमित्त ऐतिहासिक घंटेवाला मिठाईच्या दुकानावर पोहोचले. यावेळी त्यांनी स्वत: मिठाई आणि बेसनचे लाडू बनवण्याचा अनुभव घेतला. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका कढईच काविलता फिरवून मिठाई बनवताना दिसत आहेत तर त्यांनी जिलेभीही काढली.

हा व्हिडीओ सोशल मीडिया साईट एक्सवर राहुल गांधी यांनी शेअर केला आहे. त्यात त्यांनी लिहीले की, दिल्लीचे प्रसिद्ध घंटेवाला मिठाईवालेदुकानावर बेसनचे लाडू बनवले. जुन्या असलेल्या या प्रसिद्ध दुकानाची चव आजही तशीच आहे. तोच पारंपारिकपणा आणि जीभेवर रेंगाळणारी चव आहे. दिपावलीचा खरा गोडवा थाळीत नव्हे तर नात्यांमध्ये आणि समाजामध्येही असतात. त्यांनी पुढे लोकांना विचारले तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी करतात आणि कशी खास बनवता? असा प्रश्न विचारला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;