अरुणा साधू यांचे निधन
स्त्री मुक्ती संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्या, योग प्रशिक्षक अरुणा साधू (74) यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. गेली तीन वर्षे असाध्य रोगाशी त्यांचा लढा सुरू होता. त्यांच्या पश्चात सुवर्णा, शेफाली या दोन कन्या आणि वेद, तन्वी ही नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत ज्येष्ठ पत्रकार, लेखक अरुण साधू यांच्या त्या पत्नी होत. दरम्यान, अरुणा साधू यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शिवाजी महाराज पार्क येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुणा यांचा जन्म आणि शिक्षण अमरावतीमध्ये झाला. वयाच्या 20 व्या वर्षी अरुण साधू यांच्याशी लग्न करून मुंबईत आल्या. त्यानंतर गृहिणी म्हणून घर सांभाळताना त्या स्त्राr मुक्ती संघटनेशी जोडल्या गेल्या. ‘मुलगी झाली हो’, ‘हुंडा नको गं बाई’ या पथनाटय़ांमधून त्यांनी काम केले. वस्त्यांमध्ये जाऊन स्त्राr मुक्ती संघटनेसाठी काम केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List