चिनी स्पर्धेवर अमेरिकेचा ताबा; ऑनिसिमोव्हा अजिंक्य

चिनी स्पर्धेवर अमेरिकेचा ताबा; ऑनिसिमोव्हा अजिंक्य

जागतिक पातळीवर अमेरिका आणि चीन यांच्यात असलेले वैर जगद्विख्यात आहे. आज चीन ओपन स्पर्धेत अमेरिकेच्या अमांदा ऑनिसिमोव्हाने दुसऱ्या सेटमधील चुकांना झुगारत सामन्यात पुनरागमन करत चायना ओपन महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. तिने अंतिम सामन्यात  झेक प्रजासत्ताकच्या लिंडा नोस्कोव्हाला 6-0, 2-6, 6-2 अशा सेट्समध्ये पराभूत करत या वर्षी दुसर्या डब्ल्यूटीए 1000 किताबावर आपले नाव जिंकला. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या ऑनिसिमोव्हाने पहिल्या सेटमध्ये जोरदार फटकेबाजी करत केवळ 23 मिनिटांत प्रतिस्पर्धीवर मात केली. मात्र पहिल्यांदाच डब्ल्यूटीए 1000 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या 20 वर्षीय नोस्कोव्हाने दुसऱया सेटमध्ये स्वतःला सावरले. तिने सेटच्या पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस ब्रेक करत 4-2 अशी आघाडी घेतली. दोन ब्रेक पॉइंट वाचवत तिने दमदार बॅकहॅण्ड व एसेसच्या जोरावर हा सेट जिंकला.

तथापि यंदाच्या विम्बल्डन व अमेरिकन ओपनची उपविजेती ऑनिसिमोव्हा निर्णायक सेटमध्ये चपळाई व वेगाच्या जोरावर वरचढ ठरली. तिने सलग चार गेम जिंकत थकलेल्या नोस्कोव्हावर वर्चस्व गाजवले आणि करिअरमधील चौथे डब्ल्यूटीए जेतेपद आपल्या नावावर केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पवईत उद्या नवनाथ महोत्सव पवईत उद्या नवनाथ महोत्सव
पवई येथे उद्या, बुधवारी नवनाथ महोत्सव आयोजित केला आहे. यानिमित्त ‘अलख निरंजन’ या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जाणार आहे. पवईत...
अहिल्यानगरमधील शिवसेना पदाधिकारी जाहीर; शशिकांत गाडे लोकसभा संघटक, तर राजेंद्र दळवी जिल्हाप्रमुखपदी, किरण काळे महानगरप्रमुख
दिल्ली हादरली! मुंबईतही हाय अलर्ट, लाल किल्ल्याजवळ भयंकर स्फोट; 9 ठार, 24 हून अधिक जखमी
योगी आदित्यनाथ म्हणाले दुसरा जीना जन्माला येऊ देऊ नका!
भांडुप पश्चिम विधानसभेतील युवासेना पदांकरिता रविवारी मुलाखती
शिवसेना पक्ष आणि चिन्हाची उद्यापासून अंतिम सुनावणी
सातबारा, प्रॉपर्टी कार्ड, दस्त नोंदणी यांची स्वतंत्र चौकशी; खारगे समितीची पहिली बैठक