रोहितच्या जागी गिलच्या निवडीची घाई का? हरभजन सिंगचा बीसीसीआयला रोखठोक सवाल

रोहितच्या जागी गिलच्या निवडीची घाई का? हरभजन सिंगचा बीसीसीआयला रोखठोक सवाल

हिंदुस्थानच्या एकदिवसीय संघात निवड समितीने केलेल्या मोठय़ा बदलाने क्रिकेटविश्व अक्षरशः चक्रावून गेलेय. टी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणाऱया रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून शुभमन गिलकडे सोपविण्याच्या निर्णयावर माजी फिरकीपटू हरभजन सिंगने उघडपणे नाराजी व्यक्त केली. हा निर्णय अत्यंत घाईत घेतल्यासारखा वाटतो. मुळात गिलच्या निवडीची घाई कशाला, असा सवाल हरभजनने केल्यामुळे हा मुद्दाही काही दिवस आता तापणार, हे निश्चित आहे.

2027 चा आयसीसी वर्ल्ड कप जिंकून देण्याचे स्वप्न पाहणाऱया रोहित शर्माची कर्णधारपदावरून गच्छंती हे प्रकरण सोप्पे नसल्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेटमधील अनेक दिग्गज रोहितच्या पाठीशी उभे राहिले आहेत. जर तुम्ही रोहितला संघात निवडत आहात, तर कर्णधारही तोच हवा. ज्याने हिंदुस्थानला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. त्याला किमान ऑस्ट्रेलिया मालिकेपर्यंत तरी कर्णधारपद द्यायला हवे होते, असे स्पष्ट मत हरभजनने मांडले.

रोहितबद्दल नाराजी व्यक्त करताना हरभजनने शुभमन गिलवर विश्वास दाखवल्याबद्दल आनंद व्यक्त केला; परंतु ही जबाबदारी सहा महिने-एक वर्षाने दिली असती तर अधिक योग्य ठरले असते. त्यामुळे मी शुभमनसाठी खूश आणि रोहितसाठी निराश झालोय. त्याला अजून एक संधी मिळायला हवी होती.

 2027 पर्यंत रोहितच
हवा होता कैफ

ज्याने 16 वर्षे हिंदुस्थानला दिले त्याला कर्णधार म्हणून आणखी एक वर्षही दिले नाही. बीसीसीआयच्या निवड समितीने घाईघाईत आणि संवेदनशीलतेचा अभाव असलेला निर्णय घेतल्याची टीका माजी कसोटीपटू मोहम्मद कैफने केली.

कैफने सोशल मीडियावर जारी केलेल्या व्हिडीओत तुफान नाराजी व्यक्त करताना म्हटलं, ‘रोहितने 2024 मध्ये हिंदुस्थानला टी-20 विश्वचषक जिंकून दिला. त्यानंतर स्वेच्छेने कर्णधारपद सोडले. चॅम्पियन्स
ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा मान मिळवला. संघाला किताब जिंकून दिला. काही दिवस तो क्रिकेटपासून दूर राहिला आणि आता परतल्यावर त्याचे स्थानच हिरावून घेण्यात आले. हा ज्येष्ठ खेळाडूवर झालेला अन्याय आहे.’ संघाला अनेकदा संकटातून बाहेर काढणाऱया रोहितकडून कर्णधारपद काढून घेत गिलवर लवकरच विश्वास दाखवण्याची बीसीसीआयची ही घाई कैफला अजिबात रुचली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;