अँडी मरेला म्युनिच टेनिस स्पर्धा हुकणार

वृत्तसंस्था/ लंडन

ब्रिटनचा माजी टॉपसिडेड टेनिसपटू अँडी मरेला आगामी माँटे कार्लो आणि म्युनिच टेनिस स्पर्धा हुकणार आहे. मरेला अलिकडेच पुन्हा दुखापतीची समस्या जाणवत असल्याने तो या दोन स्पर्धांमध्ये खेळू शकणार नाही असे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.

मरेच्या घोट्याला दुखापत झाली असून ती अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. मरेने यापूर्वी तीन वेळेला ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. मियामी टेनिस स्पर्धेत खेळताना गेल्या रविवारी 36 वर्षीय मरेला ही दुखापत झाली होती. या दुखापतीतून बरे होण्यासाठी त्याला कांही कालावधी लागेल. मियामी स्पर्धेत मरेला मॅचेककडून हार पत्करावी लागली होती. माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धा 7 एप्रिलपासून तर बीएमडब्ल्यू खुली म्युनिच टेनिस स्पर्धा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात खेळविली जाणार आहे. या दोन्ही स्पर्धा हार्डकोर्टवरील आहेत. येत्या जुलै – ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरीस ऑलिंपिकसाठी ब्रिटनच्या संघामध्ये स्थान मिळेल, अशी आशा मरेने व्यक्त केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;