बोपण्णा – एब्डन अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ मियामी

एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या मियामी खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांनी पुरूष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात बोपण्णा आणि एब्डन यांनी ग्रेनोलर्स आणि झेबालोस यांचा पराभव केला.

पुरूष दुहेरीच्या खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बोपण्णा आणि एब्डन यांनी स्पेनचा ग्रेनोलर्स व अर्जेंटिनाचा झेबालोस यांचा 6-1, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. एटीपीच्या दुहेरीच्या मानांकनात बोपण्णाचे स्थान थोडे घसरले असून तो आता दुसऱ्या स्थानावर आहे. दुबई टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरूष दुहेरीत बोपण्णाला उपांत्यपूर्व फेरीमध्ये हार पत्करावी लागल्याने त्याचे मानांकनातील स्थान थोडे घसरले. मियामी स्पर्धेत बोपण्णाने उपांत्य फेरीचा सामना जिंकल्याने तो पुन्हा या मानांकन यादीत अग्रस्थान मिळवू शकेल. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत जेतेपद मिळविल्यानंतर बोपण्णाने एटीपीच्या मानांकनात अग्रस्थान पटकाविले होते. आता मियामी टेनिस स्पर्धेत बोपण्णा आणि एब्डन यांची अंतिम फेरीतील लढत क्रोएशियाचा डोडिग आणि अमेरिकेचा ऑस्टीन क्रेजीसेक यांच्याशी होणार आहे. डोडिग आणि क्रेजीसेक यांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या क्रेव्हेज आणि टीम पझ यांचा 6-4, 6-7 (7-9), 10-7 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. 44 वर्षीय बोपण्णाने मियामी टेनिस स्पर्धेत पहिल्यांदा पुरूष दुहेरीची अंतिमफेरी गाठली आहे. बोपण्णाने आतापर्यंत एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत 14 व्यांदा पुरूष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. त्याने एटीपी टूरवरील स्पर्धेत आतापर्यंत बोपण्णाने 63 व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळविला असून त्याने आतापर्यंत 25 वेळेला दुहेरीची अजिंक्यपदे मिळविली आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;