राजस्थान रॉयल्स संघामध्ये केशव महाराजचा समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सध्या सुरू असलेल्या 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी राजस्थान रॉयल्स संघामध्ये दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजचा समावेश करण्यात आला आहे. राजस्थान संघातील प्रसिद्ध कृष्णाच्या जागी केशव महाराजला बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे या स्पर्धेत खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने जखमी मुजीब उर रेहमानच्या जागी अफगाणचा 16 वर्षीय फिरकी गोलंदाज अल्ला गझनफरला संधी दिली आहे. 16 वर्षीय गझनफरने आतापर्यंत टी-20 च्या दोन सामन्यात अफगाण संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने आतापर्यंत टी-20 चे तीन सामने तसेच सहा अ दर्जाचे सामने खेळले आहेत. टी-20 सामन्यात त्याने 5 गडी तर अ दर्जाच्या सामन्यात 4 गडी बाद पेले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने गझनफरला 20 लाख रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे. कर्नाटकाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याच्या स्नायू दुखापतीवर अलिकडेच शस्त्रक्रिया करण्यात आल्याने तो आयपीएल स्पर्धेसाठी उपलब्ध राहू शकणार नाही. दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 50 कसोटी, 44 वनडे आणि 27 टी-20 सामन्यात एकूण 237 बळी मिळविले आहेत. त्याशिवाय त्याने 159 टी-20 सामन्यात 130 गडी बाद केले असून राजस्थान रॉयल्सने त्याला 50 लाख रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;