Pune News – वसुबारस निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान

Pune News – वसुबारस निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान

वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरुवात झाली आहे. या निमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे वसुबारस पासून ते दिवाळी पाडवा पर्यंत श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.

श्री विठ्ठलास सोने मुकुट, कौस्तुभ मणी, हिऱ्याचा कंगण जोड, दंडपेट्या जोड मोठा, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी २ पदरी, मारवाडी पेट्याचा मोत्याचा हार, शिरपेच मोठा १० लोलक असलेला, मस्त्य जोड, तोडे जोड इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. तसेच रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तारवाड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमनी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादि पारंपारिक अलंकार परिधान करणत्यात आलेले आहेत.

दिपावलीत वसुबारस, दिवाळी पाडवा, नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुकाराम भवन, श्री.ज्ञानेश्वर दर्शन मंडप व भक्त निवास इत्यादि ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तसेच संपूर्ण विठ्ठल मंदिर आणि मंदिर परिसरात मोठ्या संख्येने पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;