राहुल गांधी यांचा हल्ला; सरकार बदलल्यावर एकालाही सोडणार नाही, ही माझी गॅरंटी

राहुल गांधी यांचा हल्ला; सरकार बदलल्यावर एकालाही सोडणार नाही, ही माझी गॅरंटी

लोकशाहीचे वस्त्रहरण करणाऱयांना अशी अद्दल घडवली जाईल की पुन्हा असे करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही!

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची आर्थिक काsंडी करणाऱया मोदी सरकारवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला केला आहे. जेव्हा सरकार बदलेल तेव्हा ‘लोकशाहीचा गळा घोटणाऱयां’वर नक्कीच कारवाई केली जाईल. सरकार बदलल्यावर एकालाही सोडणार नाही, ही माझी गॅरंटी, असा इशारा त्यांनी दिला.

आयकर विभागाने नोटीस बजावल्यानंतर राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर आपली भूमिका मांडत केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपच्या सूडबुद्धीच्या राजकारणाचा समाचार घेतला. यंत्रणा इमानदारीने काम करत असत्या तर असे घडले नसते. त्यांनी विचार केला पाहिजे. कधी ना कधी भाजपचे सरकार जाणारच आहे. मग कशी कारवाई होते ते पाहाच, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला. आयकर विभागाने आता नोटीस बजावली. त्याआधी काँग्रेसची चार बँक खातीही गोठवली आहेत. त्यामुळे ऐन निडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची आर्थिक काsंडी झाली असून खर्च करता येत नसल्याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;