दोन रुपयांच्या सुटय़ा पैशांवरून वृद्धाची हत्या; रिक्षाचालकाला पाच वर्षे तुरुंगवास

 दोन रुपयांच्या सुटय़ा पैशांवरून वृद्धाची हत्या; रिक्षाचालकाला  पाच वर्षे तुरुंगवास

दोन रुपयांच्या सुटय़ा पैशांवरून वृद्ध प्रवाशाची हत्या करणाऱ्या रिक्षाचालकाला दिंडोशी सत्र न्यायालयाने पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. रामप्रवेश चौहान असे आरोपीचे नाव आहे. बोरिवली पश्चिम परिसरात 14 एप्रिल 2016 रोजी ही घटना घडली होती.

भगवती रुग्णालयाजवळील निवासी इमारतीत रात्रपाळीची डय़ुटी केल्यानंतर वृद्ध सुरक्षारक्षक घरी परतत होता. शेअर रिक्षाचे भाडे प्रत्येकी 12 रुपये होते, तर वृद्धाने रिक्षाचालकाला 20 रुपये दिले होते. यावेळी दोन रुपये सुटे न दिल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादामध्ये 24 वर्षीय रामप्रवेशने धक्काबुक्की केली असता वृद्ध खाली कोसळला व त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुसऱया दिवशी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सत्र न्यायाधीश डी. जी. ढोबळे यांनी रामप्रवेशला सदोष मनुष्यवधाच्या गुह्यात दोषी ठरवले आणि पाच वर्षे तुरुंगवास ठोठावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;