ट्रॅक्टरवर ड्रायव्हर ठेवण्याच्या वादातून हाडोळती येथे तुंबळ हाणामारी, एकाची बोटे तुटली

ट्रॅक्टरवर ड्रायव्हर ठेवण्याच्या वादातून हाडोळती येथे तुंबळ हाणामारी, एकाची बोटे तुटली

अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावात ट्रॅक्टरवर ड्रायव्हर ठेवण्याच्या क्षुल्लक वादातून दोन गटात तुंबळ हाणामारीची गंभीर घटना घडली आहे. या हाणामारीत एका व्यक्तीला बऱ्याच जणांनी अमानुषपणे मारहाण केली. जर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर मोठा अनर्थ घडला असता.

​घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोळे आणि अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.डी. भूसनूर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मारहाण होत असलेल्या व्यक्तीला बाजूच्या दुकानात सुरक्षित बंद केल्यामुळे त्याचे प्राण वाचले. या हाणामारीत एका व्यक्तीची बोटे तुटल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

​सध्या हाडोळती येथील परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या नियंत्रणात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोळे आणि पोलीस निरीक्षक बी.डी. भूसनूर हे स्वतः घटनास्थळी तळ ठोकून बसले आहेत.

​याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत काही जणांना अटक केली असून, व्हिडिओतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. हाणामारीत जखमी झालेल्या व्यक्तींना पुढील उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलीस आरोपींची धरपकड करत असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. यावेळी पीएसआय आनंद श्रीमंगल पोलीस कर्मचारी बीट अमलदार ज्ञानोबा यमले, हनुमंत आरदवाड ,मारुती शिंदे ,बेंबडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावून परिस्थिती नियंत्रणात आणली व जमावापासून एका व्यक्तीचे प्राण वाचवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;