उत्पन्न थांबलंय, मला राजीनामा द्यायचाय! मोदी सरकारमधील मंत्री राजकारण सोडण्याच्या तयारीत, वाचा सविस्तर…

उत्पन्न थांबलंय, मला राजीनामा द्यायचाय! मोदी सरकारमधील मंत्री राजकारण सोडण्याच्या तयारीत, वाचा सविस्तर…

मंत्रीपद स्वीकारल्यापासून माझे उत्पन्न थांबले आहे. त्यामुळे मला पुन्हा अभिनय क्षेत्राकडे वळायचे आहे, असे विधान केंद्रीय मंत्री आणि केरळच्या त्रिशूर मतदारसंघातील खासदार सुरेश गोपी यांनी केले आहे. रविवारी कन्नूर येथील एका कार्यक्रमात बोलताना सुरेश गोपी यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली.

सुरेश गोपी हे मल्याळम चित्रपट सृष्टीतील नावाजलेले अभिनेते असून केरळमधून निवडून आलेले भाजपचे एकमेव खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सीपीआयच्या व्हीअस सुनीलकुमार यांचा 70 हजारहून अधिक मतांनी पराभव केला. 9 जून 2024 रोजी त्यांनी मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे पर्यटन आणि पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली.

मला माझी अभिनय कारकीर्द पुन्हा सुरू करायची आहे. मला अधिक उत्पन्नाची गरज आहे. मंत्री झाल्यानंतर माझे उत्पन्न पूर्णपणे थांबले आहे, असे सुरेश गोपी म्हणाले. तसेच मी मला मंत्री करण्याचीही विनंती केली नव्हती. मला चित्रपटसृष्टीतील माझी कारकीर्द सुरू ठेवायची असून माझ्या जागी राज्यसभा खासदार सी. सदानंदन मास्टर यांना मंत्रीपद दिले पाहिजे, असे मी स्पष्ट केले होते, असेही ते म्हणाले. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, सुरेश गोपी यांनी तमिळ, तेलुगु, कन्नड आणि हिंदी भाषेतील 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. 1965 मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून कारकि‍र्दीला सुरुवात केली होती. 1992 ते 1995 दरम्यान त्यांना सुपरस्टार ही पदवी मिळाली. 1998 ला त्यांना नॅशनल अवॉर्ड आणि केरळ राज्य पुरस्कार मिळाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;