‘कांतारा चॅप्टर 1’ चा धमाका कायम

‘कांतारा चॅप्टर 1’ चा धमाका कायम

ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर 1’ प्रेक्षकांना भावत आहे.  2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित ‘कांतारा चॅप्टर 1’ ने अनेक मोठय़ा चित्रपटांना मागे टाकले आहे. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार, 10 व्या दिवशी या चित्रपटाने 37 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. 10 व्या दिवसाच्या कलेक्शनसह ‘कांतारा चॅप्टर 1’ ने या वर्षीच्या ‘सैयारा’च्या देशातील नेट कलेक्शनला मागे टाकत 329.2 कोटी कमावले.

ऋषभ शेट्टीने ‘कांतारा’मध्ये लेखन, दिग्दर्शन या जबाबदाऱ्या सांभाळतानाच मुख्य भूमिकाही साकारली आहे. वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा रोमँटिक कॉमेडी ड्रामा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ त्याच दिवशी प्रदर्शित झाला, पण त्याचा ‘कांतारा चॅप्टर 1’ वर अजिबात परिणाम झाला नाही. त्यासह ‘कांतारा चॅप्टर 1’ आता वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.  ‘कांतारा चॅप्टर 1’ जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, तमीळ व मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;