मुख्यमंत्री एकनाथ शिंदें गायब? गेल्या पाच तासांपासून कुणाशीही संपर्क नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या पाच तासांपासून गायब असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील बंगल्यावर त्यांना भेटण्यासाठी राज्यातील मंत्री दादा भुसे, उदय सामंत, हेमंत गोडसे गेले होते. मात्र दोन तीन तास उलटले तरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे काहीच चिन्ह दिसत नव्हते. त्यामुळे वैतागून तिन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून काढता पाय घेतला. मात्र त्यामुळे मुख्यमंत्री नेमके कुठे गेले आहेत याची चर्चा सुरू झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List