भाजपची नवीन टीम ‘Vasooli Titans’; टीम इंडियाच्या महिला खेळाडूची पोस्ट व्हायरल

भाजपची नवीन टीम ‘Vasooli Titans’; टीम इंडियाच्या महिला खेळाडूची पोस्ट व्हायरल

लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडू लागला आहे. यामुळे संपूर्ण देशभरात सध्या राजकारणाचे वारे वाहत आहेत. सत्ताधारी भाजपवर इलेक्टोरल बॉण्डवरून जोरदार टीका होत आहे. असे असतानाच टीम इंडियाच्या एका महिला खेळाडूने भाजपवर निशाना साधत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

टीम इंडियाची आघाडीची खेळाडू पूजा वस्त्राकरने इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि भाजपच्या इतर बड्या नेत्यांची खिल्ली उडवणारा एक फोटो तिने शेअर केला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ‘वसुली टायटन्स’ नावाची टीम बनवण्यात आली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मात्र काही वेळाने तिने पोस्ट डिलिट केली.

पूजा वस्त्राकर ही टीम इंडियाची आघाडीची खेळाडू आहे. मध्य प्रदेशकडून ती देशांतर्गत क्रिकेट खेळते. 2018 मध्ये पूजाचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला. ती एक वेगवान गोलंदाज तसेच एक चांगली फलंदाजही आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘Women’s Premier League’ मध्ये ती मुंबई इंडियन्सकडून खेळली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;