‘एआय’मुळे आयटी क्षेत्रात उलथापालथ; टीसीएस, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरातील अनेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना घरी पाठवले

‘एआय’मुळे आयटी क्षेत्रात उलथापालथ; टीसीएस, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरातील अनेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना घरी पाठवले

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आल्यापासून माहिती तंत्रज्ञान आणि टेक कंपन्यांनी आपल्या कार्यपद्धतीत मोठे संरचनात्मक बदल केलेले दिसून येत आहेत. कार्यक्षमता वाढवणे व खर्च कपात करणे, या उद्देशाने अनेक कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये टीसीएस, एक्सेंचर, मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि विप्रो यांसारख्या अनेक दिग्गज कंपन्यांची नावे आहेत. यामुळे पुणे आणि बंगळुरूसारख्या आयटी हबमधील कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

अनेक कंपन्यांचा एआयवर भर

  1. टीसीएस हिंदुस्थानातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने 2025-26 या आर्थिक वर्षात सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांची नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
  2. विप्रो आणि एचसीएल टेक विप्रो कंपनीने अधिकृत माहिती दिलेली नसली तरी कंपनीने 24,516 नोकऱ्या कमी केल्याचे समजते. एचसीएल टेकनेदेखील पुनर्रचना आणि गुंतवणुकीतील बदलांमुळे 2024 मध्ये सुमारे 8 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

जागतिक कंपन्या   

  1. एक्सेंचर जागतिक स्तरावरील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी एक्सेंचरने 11 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली आहे.
  2. गुगल आणि मायक्रोसॉफ्ट गुगलने डिझाइन विभागातील 100 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. मायक्रोसॉफ्टनेही सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगसह संपूर्ण संस्थेमध्ये सुमारे 6 हजार नोकरकपातीची घोषणा केली.
  3. सेल्सफोर्स अमेरिकेतील क्लाऊड कंपनी सेल्सफोर्सने त्यांच्या कस्टमर सपोट विभागातून 4 हजार कर्मचारी कमी केले आहेत. कॉग्निझंटने 3,500 कर्मचारी, तर आयबीएम इंडियानेदेखील
    1 हजार नोकरीची पदे कमी केली आहेत.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महापौर असताना मोहोळ बिल्डरची गाडी वापरायचे, रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक आरोप महापौर असताना मोहोळ बिल्डरची गाडी वापरायचे, रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक आरोप
मुरलीधर मोहोळ हे खासदार होण्यापूर्वी महापौर होते. हे पद सांभाळत असताना ते महापौर पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरत होते. ही...
रेशनवर गव्हासोबतच ज्वारी देणार
बांगलादेशी घुसखोर घेत आहेत सरकारी योजनांचा लाभ, देवाभाऊ, हे खरंय? सरकारने दिली थेट कबुली
पुन्हा अशी दमदाटी केली तर मला शरद पवार म्हणतात!
गर्भपातासाठी तरुणीची याचिका, हायकोर्टाने दिले वैद्यकीय तपासणीचे आदेश
भाजप कार्यकर्त्यांच्या मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅपवर कमळाबाईची बारीक नजर, पेरले ते उगवण्याची धास्ती
धक्कादायक! महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आरोप करीत महिला डॉक्टरची आत्महत्या