स्वरांच्या चांदण्यांत रसिकश्रोते धुंद, ’तोच चंद्रमा नभात’ला प्रचंड प्रतिसाद

स्वरांच्या चांदण्यांत रसिकश्रोते धुंद, ’तोच चंद्रमा नभात’ला प्रचंड  प्रतिसाद

कोजागिरीच्या चांद्रमुहूर्तावर सोमवारी रात्री विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात रंगलेल्या ’तोच चंद्रमा नभात’ या सुरेल मैफलीला संगीतप्रेमींचा तुडुंब प्रतिसाद मिळाला. महाकवी ग. दि. माडगूळकर आणि कवयित्री शांता शेळके यांनी शब्दबद्ध केलेल्या अवीट गोडीच्या गीतांच्या सुरेल सादरीकरणामुळे रसिकश्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.

मंदार आपटे, नचिकेत देसाई, धनश्री देशपांडे आणि केतकी भावे-जोशी या गायकांनी ही मैफल गाजवली. प्रशांत लळीत यांनी संगीत संयोजन केले. अनघा मोडक यांच्या निवेदनाने रसिकांची मने जिंकली.

 वर्षभरात 1200 विविध कार्यक्रम होणार

विख्यात सतारवादक पं. रवी चारी यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले. ‘मराठी भावगीतांच्या परंपरेला जपणारे असे कार्यक्रम होत राहावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, सांस्कृतिक विभागातर्फे वर्षभरात असे 1200 विविध कार्यक्रम केले जातील, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिली. यावेळी आमदार संजय पोतनीस, पराग आळवणी हे उपस्थित होते

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;